Home विदर्भ जामिया मध्ये शांतिपूर्ण आंदोलनाची परंपरा मात्र पोलिसांनी याला युद्धमैदान बनविले – आंदोलनकारी...

जामिया मध्ये शांतिपूर्ण आंदोलनाची परंपरा मात्र पोलिसांनी याला युद्धमैदान बनविले – आंदोलनकारी कवियित्री नबिया खान यांचे प्रतिपादन….!

106

यवतमाळ , दि. १४ :- शाहीनबाग आंदोलन ४३ व्या दिवशी या ठिकाणी आंदोलन सुरुच
यवतमाळ – दिल्ली येथील जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठाची नेहमी जनविरोधी व देशविरोधी निर्णयाविरुद्ध शांतीपूर्ण आंदोलन व प्रदर्शनाची परंपरा राहिली आहे .

कोणत्याही विद्यापीठाचे कैंपस हे तेथील विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित घर असते,मात्र नागरिकता संशोधन विधेयक विरोधी शांतिपूर्ण आंदोलन करणार्‍या विद्यार्थ्यांवर जामिया विद्यापीठात घुसुन पोलिसांनी अत्याचार करीत जणू एक युद्ध मैदानच बनविले होते,असे प्रतिपादन जामिया मिल्लिया इस्लामिया युनिव्हर्सिटी दिल्ली येथील विद्यार्थी नेत्या व प्रसिद्ध आंदोलनकारी कवियित्री नबिया खान यांनी केले. त्या यवतमाळ शाहीनबाग आन्दोलन येथे 13 मार्च रोजी संध्याकाळी उपस्थित शेकडो महिलांना विशेष अतिथि म्हणून सम्बोधित करीत होत्या,नबिया खान यांनी या प्रसंगी प्रसंगी नागरिकता संशोधन विधेयक,एनआरसी, एनपीआर आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बोलताना म्हटले की, कधी नव्हे इतकी मानवीयता पोलिसांनी या आंदोलनाच्यावेळी दाखविली, विद्यार्थ्यांवर पोलिसांनी टियर गैस शेल्स सोडले,अमानुष लाठीचार्ज केला,आम्ही स्वतः तिथे हजर होतो पोलिसांच्या हजर होतो.

पोलिसांच्या हिंसात्मक कारवाईने माझे अनेक मित्रही जख्मी झाले,त्यांनी आम्हाला पाकिस्तानात जाण्याची धमकी दिली,ते फक्त या युनिव्हर्सिटीमध्ये इस्लामिया इस्लामिया इस्लामिया शब्द लावला असल्यामुळे, ते म्हणाल्या मोदी,शाह यांच्या बोलनयावर आम्हाला काहीच भरोसा नाहीये, कारण घुसखोरांच्या नावावर देशात नागरिकता संशोधन कायदा,एनआरसी आनताना फक्त येथील मुस्लिमच या सरकारचा निशाना आहे,शाहीनबाग, जामिया आन्दोलन मागे न घेतल्यास आम्हाला कायदा हातात घेण्याची धमकी देण्यात आली,दिल्ली मध्ये झालेल्या दंगलीत पोलिसांना सोबत घेऊन मुस्लिमांना निशाना बनविण्यात आले,मात्र आम्ही मागे हटलो नाही,याच आंदोलनामुळे या सरकारवर मोठ्याप्रमाणात मोठ्याप्रमाणात दबाव येत असून आता गृहमंत्री अमित शहा स्वतः एनपीआर बद्दल जी भाषा बोलत आहे ती सरकार काही प्रमाणात मागे हटण्याचा हा संकेत आहे मात्र जोपर्यंत नागरिकता संशोधन कायदा मागे घेतला जात नाही,एनपीआर,एनआरसी सारखे निर्णय सरकार पूर्णतः मागे घेत नाही तोपर्यंत हे आंदोलन असेच सुरू राहणार आहे असेही नबीया खान म्हणाल्या.याप्रसंगी त्यांनी अनेक क्रांतिकारी कविता प्रस्तुत करीत शाहीनबाग आंदोलनकारी महिलांमध्ये नवी उमेद व जोश कायम केला.
दरम्यान केंद्र सरकार द्वारे लागू करण्यात आलेले संविधान विरोधी नागरिकता संशोधन कायदा { सीएए } विरुद्ध यवतमाळ शाहीनबाग धरने आन्दोलन आ शनीवारज 43 व्या दिवशीही अविरतपने सुरु आहे.मुस्लिम शरणार्थिना नागरिकता ड़ावलानारा हा कायदा केंद्र शासनाने रद्द करावा व राष्ट्रीय नागरिकत्व रजिस्टर,एनपीआर विरोधात आन्दोलन सम्पूर्ण देशात सुरु आहे,याच मागणीसाठी महिलांनी यवतमाळ येथे सुरु केलेल्या शाहीनबाग आन्दोलनात महिलांची लक्षणीय हजेरी व धरने प्रदर्शन सुरुच आहे. अवकाली पाऊस व जोरदार वारे,उन्ह ही या आंदोनकारी महिलांची हिम्मत तोड़ू शकली नाही.आन्दोलनस्थली देशभक्तिपूर्ण वातावरणात तिरंगे झेंडे खाली धरने देत असलेल्या महिलांकडून लेके रहेंगे आजादी — इन्कलाब जिंदाबाद — बायकॉट सीएए, एनआरसी,इंकलाब अब आ चुका है शाहीन तेरे नारों से सारख्या घोषणा दिवसभर गुंजत आहे.नागरिकता संशोधन विधेयक मुळे होणारे नुकसान,भविष्यात येणाऱ्या अडचणी व देशाच्या एकता अखंडता व समतेला कशाप्रकारे धोका निर्माण झाला आहे याबाबत प्रत्येक दिवशी बौद्धिक विचारवंत व विविध क्षेत्रातील मान्यवर मार्गदर्शन व सामाजिक विषयावर प्रबोधन करीत आहे.