Home महत्वाची बातमी नांदेड मनपा च्या आरोग्य केंद्रात कोरोना संशयित रूग्णांना दाखल करण्यास रहिवाश्यांनी केला...

नांदेड मनपा च्या आरोग्य केंद्रात कोरोना संशयित रूग्णांना दाखल करण्यास रहिवाश्यांनी केला तिव्र विरोध

89
0

नांदेड , दि.१४ – ( राजेश भांगे ) :-
नांदेड शहरातील विनायक नगर भागात महानगर पालिकेचे नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र असुन. या आरोग्य केंद्रात कोरोना रूग्णांना दाखल करण्याची तयारी मनपा प्रशासनाने सुरू केली आहे. हि बाब कळताच येथील नागरिकांनी रूग्णालया समोर आंदोलन करीत या आरोग्य केंद्रात कोरोना रूग्ण दाखल करू देणार नाहि अशी भुमिका घेत आरोग्य केंद्र सुरू होण्या पुर्वीच नागरिकांनी रूग्णालयाला ताळे ठोकले.
यावेळी उपस्थित नागरिकांना याबाबत विचारणा केली असता ते म्हणाले मागच्या तीन वर्षा पासुन नांदेड वाघाळा महा पालिकेने ओपीडि वार्ड म्हणुन तात्पुरते रूग्ण सेवा केंद्र म्हणुन चालु केले असले तरी इथल्या आजी माजी नगर सेवकांनी एकदा हि लक्ष दिले नसल्यामुळे मागच्या तीन वर्षी पासुन हे रूग्णालय पत्ते , जुगार , देशीदारू पिदाड्यांचा अड्डा बनला असुन. दवाखान्याच्या नावाखाली कोट्यावधी ची रक्कम इथल्या आजी माजी नगरसेवकांनी उकळली आहे व इकडे कुणीही लक्ष देण्यास तयार नाहि. आणि आता तात्पुरती सेवा म्हणून रूग्णालय चालू करण्यात येत असले तरीही कोरोना सारखे संसर्गजन्य जीवघेण्या गंभीर आजार असलेले पेशंट महानगर पालिका येथे लोकवस्तित शिप्ट करण्याचा निर्णय घेऊन स्थानिक नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचा प्रयत्न करीत आहे. तरी या निर्णयाला नांदेड , विनायक नगरवासी याचे तिव्र विरोध करीत आहोत व इथे आम्ही कुठल्याही परिस्थितीत कोरोना सारख्या गंभीर जीवघेण्या आजाराचे पेशंट इथे शिप्ट होऊ देणार नाही. जर महापालिका येथे सर्व सामान्य पणे ओपीडि सुरू करणार असेल तर आमचा याला विरोध नाहि परंतु जर येथे कोरोना पेशंट शिप्ट करण्याचा प्रयत्न केल्यास आम्ही विनायक नगरवासी या रूग्णालयात जाळपोळ व तोडफोड करून रूग्णालय पुर्णपणे बंद पाडु असा ईशारा देत नागरिकांनी रूग्णालयाला ताळे ठोकले. या आंदोलनात यावेळी महिला , जेष्ठ नागरीक व तसेच तरूण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.