Home सोलापुर वागदरी येथे वैभवपूर्ण वातावरणात नाभिक समाज जनगणना पुस्तक प्रकाशन संपन्न

वागदरी येथे वैभवपूर्ण वातावरणात नाभिक समाज जनगणना पुस्तक प्रकाशन संपन्न

134

वागदरी – नागप्पा आष्टगी

अक्कलकोट – सध्याचे डिजीटल युगात काळाबरोबर गतिमान राहणे व नवीन बदल, संकल्पना स्वीकारण़े ही मानसिकता सर्वत्र रूजु झाली आहे. संघटन वाढीसाठी व व्यापक ब़ळकटीसाठी व्यापक ग्राम पातळीवर प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य अध्यक्ष कल्याणराव दळे यांनी केले .

अक्कलकोट तालुक्यातील वागदरी येथील परमेश्वर मंदिर मंगल कार्यालयात आयोजित अक्कलकोट शहर व तालुका नाभिक समाज जनगणना पुस्तक प्रकाशन समारंभ व विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या मान्यवरांचे सत्कार कार्यक्रमात अध्यक्ष पदावरून दळे बोलत होते. या वेऴी नगरसेवक मिलन कल्याणशट्टी, जि प सदस्य आनंद तानवडे, नाभिक समाज तालुका अध्यक्ष शिवरणप्पा सुरवसे, राज्य उपाध्यक्ष वैभव शेटे
सिद्धार्थ गायकवाड, शरणु काळे माजी उपाध्याय कृशी उत्पन्न बाज़ार समिति अक्कलकोट, रविकीरण वारनाळे, सिद्धाराम बटगेरी, धुळाप्पा निबाळे चनबसप्पा चितली, सिद्धाराम खुने, विजयकुमार ढ़ोपरे, सायबु गायकवाड़, शिवा घोळसगाव, जगदीश सुरवसे, भागवती, किशोर शेटे साहेब, मलप्पा निरोळी, सुनिल सावंत आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रारंभ प्रतीमेचे पूजन तानवडे यांचे हस्ते झाले. तर दिप प्रज्वलन नगरसेवक महेश इंगळे यांचे झाले तर पुस्तक प्रकाशन नगरसेवक मिलन कल्याणशट्टी यांच्या हस्ते झाले. त्या नंतर तालुका अध्यक्ष शिवरणप्पा सुरवसे यांनी प्रस्ताविकातुन नाभिक समाज जनगणना बाबत सविस्तार माहिती दिली.
सुत्रसंचालन सुभाष सुरवसे तर आभार सुदर्शन विभुते यांनी मानले.

पुरस्कार प्राप्त मान्यवर :-सिध्दाराम बटगेरी. , धुळप्पा निंबा़ळे, परमेश्वर सुरवसे, सातप्पा सुरवसे, यशवंत सुरवसे, देवदास वाळके, सुभाष गायतोंडे, आनंदराव सुरवसे