Home विदर्भ जलशुद्धीकरण केंद्राच्या नळाला ” जुगाळ”

जलशुद्धीकरण केंद्राच्या नळाला ” जुगाळ”

166

नळतोठ्या अभावी पाण्याचा अपव्यय

कोरपना – मनोज गोरे

गडचांदूर शहरातील अनेक भागात टाकलेल्या नळ कनेक्शन चे पाईप लिकेज असल्याने पाण्याचा भर उन्हाळ्यात अपव्यय होत असल्याचे चित्र सुरू आहे.त्यात नळाला जर तोठ्या लावल्या असत्या तर पाण्याचा अपव्यय झाला नसता.यासर्व बाबी संबंधित विभाग तसेच अधिकारी यांना माहीत असून सुध्दा दुर्लक्ष करत असल्याचे दिसते आहे.


काही ठिकाणी नळ देण्याचे कार्य आग्रहास्तव करण्यात आल्याचे समजते.परंतु अनेक भागात अजूनही पाणी टंचाई भासत असल्याने काही नागरिकांनी नळ जोडणीची मागणी केलेली आहे.याकडे दुर्लक्ष करत असल्याचे काही नागरिकांचे म्हणणे आहे.
अनेकठिकानी पाईप लाईन जुनीच असल्याने दहावर्षापासून पाईप फुटल्याने शहरातील अनेक भागात पाणी रस्त्यावर जमा होत असल्याने खोदकाम केलेल्या भागत चिखल होत आहे.याबाबीकडे संबंधित विभाग जाणून बुजून दुर्लक्ष तर करत नाही ना ..? असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केलेला आहे.
शहरात प्रभाग एकमध्ये काही मोजक्याच ठिकाणी नळ कनेक्शन दिलेले आहे. त्यात रस्ता खोदकाम केल्याने चांगल्या रस्त्याचे तीनतेरा वाजलेले आहे.त्यामुळे नियोजनाचा भोंगळ कारभार दिसून येत आहे.त्यात लावलेल्या नळ कनेक्शनला तोठ्या च नसल्याने पाण्याचा अपव्यय होत आहे.याबाबतीत वृत्तपत्रात माहिती देऊनही संबंधित विभाग कमालीचे दुर्लक्ष करत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
नळ कनेक्शन देण्याची मागणी –
उन्हाळ्यात गडचांदूर मध्ये भीषण पाणीटंचाई येत असते त्यामुळे सदर काम त्वरीत करून उन्हाळ्यात नागरिकांना नळ कनेक्शन देण्याची मागणी नागरिकांनी केलेली आहे.त्यामुळे थातूर मातूर काम न करता नागरिकांना घरपीचे नळ कनेक्शन देण्यासाठी प्रयत्न करण्याची मागणी होत आहे.