Home महत्वाची बातमी धावती मुंबई च्या मुख्य संपादिका श्वेता किशोर पालव “आदिशक्ती” पुरस्काराने सम्मानित

धावती मुंबई च्या मुख्य संपादिका श्वेता किशोर पालव “आदिशक्ती” पुरस्काराने सम्मानित

386

अमीन शाह

ठाणे , दि. २५ :- डोंबिवली पश्चिमे येथे आयोजित मालवणी महोत्सवाला
डोंबिवली हे एक सांस्कृतिक नगरी म्हणून ओळखले जाणारे शहर आहे .वेगवेगळ्या कलाकृती ने नटलेले असे या डोंबिवली मध्ये विविध कार्यक्रमाचे व वेग वेगळे विविध उपक्रम राबविले जातात .त्याच प्रमाणे वेगवेगळे महोत्सवा येथे आयोजित केले जातात .अशाच महोत्सवापैकी एक मालवणी महोत्सव डोंबिवली पश्चिमेला बागशाळा मैदान इथे आयोजित करण्यात आले होते .

पहिल्याच दिवशी मैत्री कल्याणकारी संस्था तर्फे आयोजित मालवणी महोत्सवा ला अनेक नामवंत प्रतिष्ठित प्रमुख पाहुणे तसेच डोंबिवली पश्चिमेतील शिवसेना नगरसेवक जनार्दन महात्रे यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती महोत्सवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला ढोल-ताशांच्या गजरात सलामी देऊन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली होती सामाजिक व राजकीय क्षेत्रात आपल्या दमदार उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शिवसेना नगर सेवक मा. श्री जनार्दन महात्रे यांच्या हस्ते ” आदिशक्ती” हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले व त्यांचा गौरव करण्यात आला त्यांना आदी शक्ती पुरस्कारांने गौरविण्यात आले सामाजिक क्षेत्रात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलां सन्मान महाराष्ट्र न्यूज व धावती मुंबई वृत्तपत्र च्या संपादिका सौ श्वेता किशोर पालव ,याना “आदीशक्ती “पुरस्काराने सन्मानित करण्यात आले अस्तिव प्रतिष्ठान च्या विश्वस्त सौ राधिका गुप्ते ,एडव्होकेट माया गायकवाड, काशीबाई जाधव , सुमेधा परब,लोचन पवार तथा अनेक उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा आदिशक्ती पुरस्कार देऊन गौरव सम्मान करण्यात आला .मैत्री कल्याणकारी संस्था चे सचिव व कार्यक्रमाचे आयोजक मा श्री प्रदीप बावस्कर (वकील उच्च न्यायालय)
सौ कविता देशपांडे (अध्यक्ष )
सौ प्राजक्ता देशपांडे (सल्लागार) हे प्रामुख्याने कार्यक्रमात उपस्थित होते आयोजित या कार्यक्रमात मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते .