Home राष्ट्रीय दिल्ली 12 वर्ष विकासाची, 12वर्ष जनकल्याणाची…!

12 वर्ष विकासाची, 12वर्ष जनकल्याणाची…!

113

2014 ते 2026… गेली 12 वर्षे केवळ सत्तेची नव्हे, तर महासत्तेच्या दिशेने झेपावणाऱ्या बदलत्या भारताचची साक्षीदार आहेत. नरेंद्र मोदीजींच्या खंबीर नेतृत्वाखाली देशाने आर्थिक मंदी आणि आव्हानांवर मात करत, UPI च्या क्रांतीपासून ते थेट जनधन खात्यांपर्यंत अभूतपूर्व डिजिटल प्रगती साधली.

​’वंदे भारत’ रेल्वे, जागतिक दर्जाचे महामार्ग आणि ‘मेक इन इंडिया’च्या माध्यमातून भारत आज जागतिक उत्पादनाचे मुख्य केंद्र बनला आहे. आयुष्मान भारत, उज्ज्वला आणि जल जीवन मिशन यांसारख्या योजनांनी प्रत्येक सामान्य नागरिकाचे जीवनमान उंचावून जनकल्याणाचा नवा वस्तुपाठ घालून दिला.
​कोविड काळातील लस मैत्री असो वा G-20 चे ऐतिहासिक यजमानपद, भारताने जागतिक राजकारणात आपले अढळ स्थान निर्माण केले आहे. सीमा सुरक्षेपासून ते अंतराळ मोहिमांपर्यंत प्रत्येक क्षेत्रात घेतलेली ही उत्तुंग झेप म्हणजेच ‘विकसित भारताच्या’ संकल्पनेला प्रत्यक्षात आणणारे एक सोनेरी पर्व आहे.