Home यवतमाळ यवतमाळ भूमी अभिलेख विभागातील शिपाई भरती प्रक्रियेबाबत पारदर्शकतेची मागणी…!

यवतमाळ भूमी अभिलेख विभागातील शिपाई भरती प्रक्रियेबाबत पारदर्शकतेची मागणी…!

98
यतवमाळ – महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शनाखाली भारत विकास ग्रुप ( BVG ) संस्थेमार्फत भूमी अभिलेख विभागातील शिपाई पदांची भरती प्रक्रिया सुरू आहे. या भरतीसाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध असतानाही जिल्ह्यातील काही भूमी अभिलेख कार्यालयांमध्ये संबंधित उपअधीक्षक व अधिकाऱ्यांच्या शिफारशीनुसारच उमेदवारांची निवड होत असल्याचा आरोप करण्यात येत आहे.
या संदर्भात अखिल भारतीय ग्राहक संरक्षण समितीचे तालुका अध्यक्ष जितेंद्र उके यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन या प्रक्रियेबाबत लक्ष वेधले आहे.
भरतीमध्ये स्थानिक अधिकाऱ्यांच्या शिफारशींना प्राधान्य दिले जात असल्याने अनेक पात्र व बेरोजगार उमेदवार वंचित राहत असल्याचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला आहे. शिपाई पदभरती प्रक्रिया अधिक पारदर्शक, न्याय्य व सर्वसामान्य बेरोजगारांना समान संधी देणारी असावी, तसेच संपूर्ण प्रक्रिया जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात यावी, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे. दरम्यान, या भरती प्रक्रियेबाबत स्थानिक पातळीवर चर्चा सुरू असून बेरोजगार उमेदवारांच्या हिताचा विचार करून योग्य निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.