Home यवतमाळ दुष्यंत चतुर्वेदी यांच्यावर दुसऱ्यांदा यवतमाळ विधान परिषद विजयाचा गुलाल.

दुष्यंत चतुर्वेदी यांच्यावर दुसऱ्यांदा यवतमाळ विधान परिषद विजयाचा गुलाल.

210
यवतमाळ – विधान परिषद निवडणुकीत एकूण पाच जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. शिवसेनेचे दुष्यंत चतुर्वेदी यांच्या विरोधात महाविकास आघाडीतून काँग्रेसचे राज्य सरचिटणीस साहेबराव कांबळे यांना उमेदवारी देण्यात आली होती तर भाजप समन्वयक नितीन भुतडा यांच्यासह आर्णी येथील राष्ट्रवादी ( अजित पवार ) गटाचे साजिद बेग आणि दारव्हा येथील काँग्रेसचे माजी नगराध्यक्ष सैयद फारूख यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली होती.
बुधवार दिनांक 3 जून 2026 रोजी महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला. उमेदवार साहेबराव कांबळे यांनी पक्षनेत्यांशी कसलीही चर्चा न करता अचानकपणे जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल होत आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. कांबळे यांनी माघार घेतल्यानंतर यवतमाळची विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार हे जवळपास निश्चित झाले होते. तरीही अपक्ष उमेदवाराला पुरस्कृत करून निवडणूक व्हावी यादृष्टीने काँग्रेसने प्रयत्न केले होते. मात्र यातही अपयश आल्याचे स्पष्ट झाले. आज गुरुवार दिनांक 4 जून 2026 रोजी पक्षाच्या निर्देशानुसार नितीन भुतडा यांनी अर्ज मागे घेतला. त्यानंतर दोन अपक्षांनीही माघार घेतल्याने दुष्यंत चतुर्वेदी यांची बिनविरोध निवड झाली आहे.
Previous articleकर्जमाफी की शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ?
editor
भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.