
अमिन शाह
नांदुरा येथील तहसीलदार हल्ल्यातील आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने 24 तासात साखरखेर्डा हद्दीतील ग्राम सावंगी भगत येथून अटक केली असून आरोपी कडून 5,01,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय.
नांदूरा पोलीस स्टेशन येथे दि.23 एप्रिल रोजी फिर्यादी श्रीशैल सुभाष व्हट्टे नायब तहसीलदार नांदूरा यांनी तक्रार दिली की, 23 एप्रिल रोजी दुपारी 12 वाजता तहसील कार्यालय, नांदूरा येथे फिर्यादी व साक्षीदार शासकिय काम करीत असतांना, आरोपी समाधान भगवान मोरे रा.
बुलढाणा व इतर 1 यांनी तहसीलदार अजीतराव जंगम यांच्या कक्षात येऊन, त्याचे पकडलेले टिप्पर वाहन क्र. MH-28-AB-7638 यावर कायदेशीर कार्यवाही केल्याचा राग मनात धरुन, अव्वर कारकुन यांना धमकावून, तहसीलदार अजीतराव जंगम यांचे डोक्यात लोखंडी वस्तुने प्रहार केला, चापटा-बुक्क्यांनी मारहाण व लोटपाट केली तसेच त्यांचा शर्ट फाडून त्यांना जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या. अशा तक्रारीवरुन पो.स्टे. नांदूरा येथे आरोप विरुध्द अप.क्र. 280 / 2026 कलम 132,121 (1),121(2),352,351 (2),351(3), 3(5) BNS प्रमाणे गुन्हा नोंद आहे. सदर गुन्ह्यानंतर आरोपी व त्याचा साथीदार वाहनाने घटनास्थळवरुन पळून गेले होते. याप्रकरणी पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी सदर गुन्ह्याची गंभीरता आणि संवेदनशिलता लक्षात घेऊन गुन्ह्यातील आरोपीचा तात्काळ शोध घेऊन अटक करणेबाबत स्थानिक गुन्हे शाखेला आदेशीत केले होते. या अनुषंगाने, पोनि सुनिल अंबुलकर यांनी या गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेण्यासाठी स्था. गु. शाखेचे 3 पथके स्थापन करुन त्यांना वरिष्ठांच्ये निर्देशांप्रमाणे आरोपीचा त्वरीत शोध घेऊन अटक करणेबाबत सुचित केले. दरम्यान दि. 24 एप्रिल रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गोपनीय बातमी मिळाली की, आरोपी समाधान मोरे हा पो.स्टे. साखरखेर्डा हद्दीतील ग्राम सावंगी भगत येथे लपून आहे. सदर माहितीच्या आधारे पोनि. सुनिल अंबुलकर यांचे नेतृत्वात
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पो.स्टे. साखरखेर्डा हद्दीत ग्राम सावंगी भगत येथे तात्काळ कार्यवाही करुन आरोपी समाधान भगवान मोरे वय 52 वर्षे, रा. सम्राट अशोक नगर, बुलढाणा ता. बुलढाणा यास मोठ्या शिताफीने केवळ 24 तासांचे आतमध्ये पकडले. आरोपी कडून स्टिलचा चाकू किं. 500 रु, लोखंडी कोयता किं. 500 रु, विनानंबर क्रेटा गाडी किं.5,00,000 रु. असा एकूण 5,01,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. आरोपी समाधान भगवान मोरे वय 52 वर्षे, रा. सम्राट अशोकनगर, बुलढाणा यास पो.स्टे. नांदूरा यांचे ताब्यात देण्यात आले. वि. न्यायालय नांदूरा यांनी आरोपीला 27 एप्रिल पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मंजूर केला असून गुन्ह्याचा पुढील तपास पो.स्टे. नांदूरा करीत आहेत. सदरची कामगिरी निलेश तांबे – पोलीस अधीक्षक बुलढाणा यांचे आदेशान्वये तर श्रेणिक लोढा अपर पोलीस अधीक्षक खामगांव, अमोल गायकवाड-अपर पोलीस अधीक्षक बुलढाणा यांचे मार्गदर्शनाखाली पोनि. सुनिल अंबुलकर स्था. गु.शा. बुलढाणा यांचे नेतृत्वात सपोनि. यशोदा कणसे, पोउपनि अविनाश जायभाये, पोहेकॉ. दिपक लेकुरवाळे, शरद गिरी, राजू टेकाळे, चाँद शेख, जगदेव टेकाळे, गणेश पाटील, विजय वारुळे, पोकॉ. अमोल अंभोरे, मंगेश सनगाळे, चापोहेकॉ. विकास देशमुख, समाधान टेकाळे नेमणूक स्थागुशा. बुलढाणा, सपोनि. श्री. गजानन कारेवाड पो.स्टे. साखरखेर्डा, पोहेकॉ.राजू आडवे तांत्रिक विष्लेषण विभाग बुलढाणा यांच्या पथकाने केली.












































