Home यवतमाळ झरी तालुक्यातील दुर्भा नदीपात्रात बोट व पोकलेने रेती उपसा….!

झरी तालुक्यातील दुर्भा नदीपात्रात बोट व पोकलेने रेती उपसा….!

48

रेतीचा बेकायदेशीरपणे उपसा नदीचा प्रवाह दूषित, तरीसुद्धा प्रशासन गप्प

यवतमाळ – यवतमाळ जिल्ह्यातील झरी तालुक्यातील दुर्भा नदी पात्रात बोटी, पोकलेन आणि जड मशिनरीच्या साहाय्याने मोठ्या प्रमाणावर अवैध रेती उपसा केला जात असल्याचा धक्कादायक प्रकार व्हिडिओसह समोर आला आहे. सदर नियमांनुसार नदी पात्रातून रेती उपसा करण्यासाठी यंत्रसामग्रीचा वापर करण्यास बंदी असताना देखील काही रेती माफिया पोकलेन व जड मशिनरीच्या मदतीने रेतीचा उपसा करीत असल्याचे दिसून आले आहे.
सदर रेती चोरीमुळे नदीचा नैसर्गिक समतोल बिघडण्याची भीती गावकऱ्यांद्वारे व्यक्त केली जात आहे. मोठ्या प्रमाणावर होत असलेल्या रेती उपशामुळे परिसरातील भूजल पातळी झपाट्याने खाली जात असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली. नदीपात्रातून रेती उपसा करताना पोकलेन, बोट व इतर मशिनरीचा वापर करण्यास शासनाने बंदी घातली असताना देखील मोठ्या प्रमाणात रीती उपसा सुरू आहे.