Home यवतमाळ यवतमाळ शहरातील धामणगाव महामार्गावर ट्रक जळून खाक

यवतमाळ शहरातील धामणगाव महामार्गावर ट्रक जळून खाक

341
filter: 0; fileterIntensity: 0.0; filterMask: 0; captureOrientation: 0; runfunc: 16; algolist: 0; multi-frame: 1; brp_mask:0; brp_del_th:0.0000,0.0000; brp_del_sen:0.0000,0.0000; motionR: 0; delta:1; bokeh:1; module: photo;hw-remosaic: false;touch: (-1.0, -1.0);sceneMode: 13107200;cct_value: 0;AI_Scene: (-1, -1);aec_lux: 0.0;aec_lux_index: 0;albedo: ;confidence: ;motionLevel: -1;weatherinfo: weather?null, icon:null, weatherInfo:100;temperature: 44;zeissColor: bright;

द बर्निंग ट्रक

यवतमाळ – गुराढोरांसाठी कुटार घेऊन जाणाऱ्या ट्रकने अचानक पेट घेतला. धूर निघत असल्याचे लक्षात येताच चालकाने ट्रक कडेला उभा केल्याने मोठी दुर्घटना टळली. मात्र ट्रक व त्यामधील कुटार पूर्णतः जळून खाक झाल. धामणगाव रेल्वे ते यवतमाळ महामार्गावर 15 एप्रिल 2026 रोजी दुपारी चार च्या सुमारास यवतमाळ शहरातील मोहा फाटा जवळ ही घटना घडली.

MH 31 CB 0646 या क्रमांकाच्या ट्रकमध्ये कुटार घेऊन यवतमाळकडे महामार्गाने निघाला होता. धूर येत असल्याचे चालकाच्या लक्षात आले. त्याने तातडीने ट्रक रस्त्याच्या एका कडेला उभा केला. तोपर्यंत मोठी आग पकडली होती आणि आगीमुळे ट्रकचे मोठ्या करकश्या आवाजात चारी टायर फुटले. तसेच यवतमाळ शहराचे तापमान लक्षात घेता व ट्रक चालून – चालून गरम आल्यामुळे ही ट्रकने पेट घेतला असावा असेही बोलल्या जात आहे. तसेच घटनास्थळी मी प्रामुख्याने उपस्थित होतो व माझ्यासोबत यवतमाळ शहरातील दंडाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी हे सुद्धा उपस्थित होते. मी प्रत्यक्षात यवतमाळ कंट्रोल रूमला फोन लावला असता तुम्ही कोण व कुठून बोलत आहे असे म्हणण्यात आले. घटनास्थळी घडलेल्या संपूर्ण परिस्थिती माहिती देऊन सुद्धा काय झाले नाही व लगेच त्यानंतर यवतमाळ नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांना दोन वेळा फोन लावला असता त्यांनी उचलला नाही आणि त्यानंतर लगेच मी यवतमाळ जिल्ह्याचे जिल्हाधिकारी विकास मीना यांना फोन लावला असता, घटनास्थळी सर्व घडलेली परिस्थिती व माहिती सांगितली.