Home यवतमाळ जिजाऊ–सावित्री संवादाने ‘समता पर्व 2026’ची भव्य सुरुवात

जिजाऊ–सावित्री संवादाने ‘समता पर्व 2026’ची भव्य सुरुवात

197

यवतमाळ  ( प्रतिनिधी  ) – क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त समता पर्व प्रतिष्ठान, यवतमाळ यांच्या वतीने आयोजित समता पर्व 2026 ची भव्य सुरुवात मंगळवार, दिनांक 7 एप्रिल रोजी सायंकाळी 7 वाजता उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आली. या पर्वाचा शुभारंभ ‘जिजाऊ संवाद’ व ‘सावित्री संवाद’ या प्रभावी सादरीकरणांनी झाला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समता पर्वाचे अध्यक्ष नारायण थूल होते. यावेळी मार्गदर्शक प्रवक्ता उमेश मेश्राम, डॉ. चंद्रकांत सरदार, जनार्दन मनवर, डॉ.विलास कनाके, वनमाला वंजारी,, चंद्रकांत वाळके, प्रा. विजय डोंगरे, मृणालिनी दहिकर, कवडू नगराळे, दीपक नगराळे तसेच प्रसिद्ध संगीतकार डॉ. मधुकर मिश्रा यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या वेशभूषेत आराध्या लोहकरे हिने साकारलेल्या प्रभावी संवादाने झाली. तिच्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली. त्यानंतर धैर्या देशपांडे हिने ‘जिजाऊ संवाद’ सादर करत छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री जिजाऊंच्या विचारांचा प्रभावी संदेश दिला.

कार्यक्रमात दोन चिमुकल्यांनी महात्मा ज्योतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून वातावरण भावूक केले. यावेळी डॉ. मधुकर मेश्राम यांचा सन्मानही करण्यात आला.

या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी पल्लवी कांबळे, रीना वानखडे, हर्षाली बोडके, स्नेहा डोंगरे, ॲड. वैशाली हिरे, बीना नागदिवे, शुभांगी मालखेडे, ज्योती जीवने आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन राहुल कोचे यांनी केले, तर आभार प्रदर्शन पल्लवी रामटेके यांनी मानले.

समता, बंधुता व सामाजिक परिवर्तनाचा संदेश देणाऱ्या या पर्वाची सुरुवात उत्साहात झाली असून पुढील दिवसांत विविध सांस्कृतिक, शैक्षणिक व प्रबोधनात्मक कार्यक्रमांची मेजवानी यवतमाळकरांना मिळणार आहे.