Home यवतमाळ जिल्हाधिकारी साहेब, सायफळ पैनगंगा नदीपात्रात चाललंय तरी काय?

जिल्हाधिकारी साहेब, सायफळ पैनगंगा नदीपात्रात चाललंय तरी काय?

148
महसूल अधिकाऱ्याच्या डोळ्यादेखत चालत आहे रेती तस्करीचा खेळ.
दररोज केली जाते लाखो रुपयाची रेती तस्करी.
शासनाचा लाखो रुपयांचा महसूल पाण्यात

 

घाटंजी  – तालुक्यातील कुर्ली महसूल मंडळातील सायफळ येथिल पैनगंगा नदी रेती तस्करांनी अक्षरषा दिवसा ढवळ्या पोकरून दररोज शेकडो ब्रास रेतीचे उत्खनन करून खुलेआम विस ते पंचवीस ट्रॅक्टर द्वारे वाहतूक केली जात आहे मात्र महसूल व पोलीसाकडून अद्यापही सायफळ रेती घाटावर कारवाई करण्यासाठी पुढे न आल्याने कुठे तरी पाणी मुरत आहे का असा प्रश्न सर्व सामान्य जनतेला पडत आहे एकीकडे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे अैवध रेती उत्खनन करणा-यावर कठोर कारवाई करा मात्र याकडे घाटंजी महसूल विभाग जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे का अर्थपुर्ण दुर्लक्ष करीत आहे का अशी शंका उपस्थित केला जात आहे गत दोन महीन्यापासून महसूल पथक कुठेही फिरकतांना दिसत नाही एकेकाळा दररोज फिरकणारे महसूल पथक अचानक का बंद झाले या मागचे सत्य शोधणे गरजेचे आहे सायफळ नदीपात्रातून रेती तस्करी सुरू असल्याबाबत तहसिलदार तलाठी मंडळ अधिकारी यांना माहीती देवूनही कारवाई होत नसल्याने लिलाव न झालेले रेतीघाटातून सुध्दा लिलाव झाल्यासारखे खुलेआम दिवसा ढवळ्या रेतीचे बिनधास्तपणे उत्खनन करीत असल्याने नदीपात्रात मोठ्या प्रमाणात मोठमोठे खड्डे पडले आहे या अैवध रेती उपसा मुळे नदीपात्रातील पाणी पातळी सुध्दा कमी होत आहे पैनगंगेच्या काठावरील शेताजवळ मोठ्या प्रमाणात रेती साठवून ठेवल्या जाते व त्या रेती साठ्याची रात्री किनवट तालुक्यातील तस्करांना विकले जाते सायफळ गावाला लागून मराठवाडा असल्याने सदरच्या किनवट तालुक्यातील गावात पैनगंगा नदीपात्रातील रेती ला मोठी मागणी आहे यामुळे सायफळ येथिल काही अट्टल रेती या संधीचा फायदा घेऊन दररोज शेकडो ब्रास रेतीचे उत्खनन करीत आहे मात्र ईतक्या मोठ्या प्रमाणात सुरु असलेल्या अैवध रेती उत्खननाकडे ना तलाठी फिरकत आहे ना मंडळ अधिकारी सायफळ नदीपात्रात मोठ्या प्रमाणात रेती तस्करी सुरू असल्याबाबत तलाठी मंडळ अधिकारी यांना माहीती असतांनाही ते रेती घाटाकडे का फिरकत नाही आहे हे न समजनारेच कोडे आहे सायफळ येथिल पैनगंगा नदीपात्रात यंदा मोठ्या प्रमाणात रेती असल्याने तस्कर दिवस रात्र बिनधास्तपणे रेतीचे उत्खनन करून लाखो रुपये जमा करीत आहे मात्र शासनाचे लाखो रूपयांचे महसूल पाण्यात बुडत असतांना संबधीत विभागाचे अधिकारी कर्मचारी उघड्या डोळ्याने पाहत आहे सायफळ येथिल पैनगंगा नदीपात्रातून गत एक महिन्यापुर्वी रात्री रेतीचे उत्खनन वायचे मात्र सायफळ घाटाकडे महसूल विभागाचे अधिकारी कर्मचारी फिरकत नसल्याने आता तर चक्क दिवसाढवळया रेतीचे उत्खनन केले जात आहे रेती उत्खनन करून वनविभागाच्या हद्दीतून खुलेआम वाहतूक केली जाते मात्र येथे कार्यरत असलेले वनरक्षक वनपाल यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे सायफळ येथिल सक्रूनाईक तांड्याकडे असलेल्या रेती घाटावरून व पैनगंगा नदीवर सुरु असलेल्या उच्च पातळी बंधा-या कडे असलेल्या रेती घाटावरून उत्खनन करून वाहतूक केली जात आहे नदीपात्रात ट्रॅक्टर रेती उत्खनन करण्यासाठी जाताच काही रेती तस्कर सायफळ तपासणी नाक्या समोर असलेल्या एका गाईच्या गोठ्यात लोकेशन साठी असतात तर काही तस्कर चिखलवर्धा सायफळ रोडवर असतात यामुळे सायफळ घाटावर कारवाई करण्यासाठी शासकीय वाहनाने न येता खाजगी वाहनात आल्यास अनेक ट्रॅक्टर हाती लागू शकतात याकडे महसूल पोलीस लक्ष देईल का हे पाहणे तितकेच महत्वाचे आहे.