Home यवतमाळ गाठीभेटी’ विवाह परिचय मेळावा उत्साहात संपन्न; युवक-युवतींचा उत्स्फूर्त प्रतिसाद

गाठीभेटी’ विवाह परिचय मेळावा उत्साहात संपन्न; युवक-युवतींचा उत्स्फूर्त प्रतिसाद

150

यवतमाळ  ( प्रतिनिधी ) – डॉ. बाबासाहेब आंबेडकर व रमाई यांच्या विवाह सोहळ्याच्या स्मृतिदिनी आयोजित करण्यात आलेला स्नेहबंध ‘गाठीभेटी’ विवाह परिचय मेळावा यवतमाळ येथे अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरित्या पार पडला. अल्पावधीत नियोजन करूनही या मेळाव्यास पालकवर्ग तसेच विवाहासाठी इच्छुक युवक-युवतींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

समाजामध्ये सुसंवाद निर्माण करून योग्य जुळणीसाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमात सहभागी युवक-युवतींना आपली माहिती सादर करण्याची तसेच पालकांना प्रत्यक्ष संवाद साधण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली. त्यामुळे उपस्थितांमध्ये समाधानाचे वातावरण दिसून आले.
या कार्यक्रमाचे सुयोग्य नियोजन डॉ. सुषमा वाणे, निवेदिता पाटील, संजय वाणे, जयदेव पाटील, रंजनाताई ताकसांडे, प्रा. प्रिया वाकडे, निलध्वज कांबळे, रुपेश वानखडे, आशा अबादे, चंदा ढोके, स्नेहा डोंगरे आणि देवांगना मेश्राम यांनी केले.
कार्यक्रमादरम्यान पंजाब गावंडे सर यांनी आपले मनोगत व्यक्त करत उपक्रमाचे कौतुक केले व अशा प्रकारचे सामाजिक उपक्रम काळाची गरज असल्याचे मत व्यक्त केले. तसेच बोधिसत्व विहार येथे कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी रवी भगत व मोहन भवरे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
सर्वांच्या सहकार्यामुळे हा विवाह परिचय मेळावा यशस्वीरीत्या पार पडल्याची भावना आयोजकांनी व्यक्त केली असून, भविष्यातही अशा उपक्रमांचे आयोजन करण्याचा मानस व्यक्त करण्यात आला.