Home यवतमाळ महा मायनॉरिटी NGO फोरम यांच्या राज्यस्तरीय कॉन्फरन्समध्ये सामाजिक कार्याची दखल घेऊन अतीक*...

महा मायनॉरिटी NGO फोरम यांच्या राज्यस्तरीय कॉन्फरन्समध्ये सामाजिक कार्याची दखल घेऊन अतीक* *अफजल शेख यांची यवतमाळ जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती

253

यवतमाळ – दि. -28 मार्च 2026 रोजी हज हाऊस, मुंबई येथे महा मायनॉरिटी NGO फोरम यांच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय NGO कॉन्फरन्स / अल्पसंख्यांक समाज विकास परिषद मोठ्या उत्साहात पार पडली.

या परिषदेमध्ये महा मायनॉरिटी NGO फोरम, शाखा – यवतमाळ अंतर्गत अतीक अफजल शेख यांची सामाजिक कार्याची दखल घेऊन यवतमाळ जिल्हाध्यक्ष पदावर अधिकृत नियुक्ती करण्यात आली.
यावेळी संस्थापक अध्यक्ष मा. जाकीर शिकलगार सर व अब्दुल बारी सर यांच्या शुभहस्ते अतीक अफजल शेख यांना नियुक्तीपत्र प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमाला समाजवादी पक्षाचे नेते व आमदार मा. श्री. अबु आझमी साहेब यांचीही विशेष उपस्थिती होती.
तसेच, या परिषदेस राज्यातील 36 जिल्ह्यांमधील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते, ज्यामुळे कार्यक्रमाला विशेष महत्व प्राप्त झाले.
या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी अतीक शेख यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा देत, त्यांच्या नेतृत्वाखाली यवतमाळ जिल्ह्यात अल्पसंख्यांक समाजाच्या विकासासाठी प्रभावी व उल्लेखनीय कार्य होईल, असा विश्वास व्यक्त केला.
तसेच, या परिषदेमुळे राज्यभरातील सामाजिक कार्याला नवी दिशा मिळणार असून, महा मायनॉरिटी NGO फोरम च्या कार्याला अधिक बळकटी मिळणार असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.