Home यवतमाळ तासलोट शिवारात बेवारस लास तरुणीचा खून

तासलोट शिवारात बेवारस लास तरुणीचा खून

928
कळंब तालुका प्रति :-विरेंद्र चव्हाण
कळंब :-जोडमोहा पासून अवघ्या तीन किमी अंतरावर तासलोट तालुका कळब दंगल शिवारात तीन चार दिवसा अगोदर तरुणीची चाकू भोसकून हत्या करण्यात आली व अर्धवट शरीर झालेल्या अवस्थेत आढळून आले व उजवा हात व पायाचे लचके कुत्र्यांनी किंवा वन्यप्राण्यांनी तोडले असावे तरुणीची सडलेल्या अवस्थेत दंत पडले होते त्यामुळे दुर्गंधी सुटली होती ही घटना कळंब पोलीस स्टेशन अंतर्गत घडली. दिनांक 15 मार्च रविवारला सकाळी 7.30 वाजता जोडमोहा येथील शेतकरी किशोर राठोड शेतात जात असताना तासलोट जंगलातील पांदण रस्त्याच्या कडेला सडलेल्या अवस्थेत व अर्धवट झालेल्या अवस्थेत तरुणीचा मूर्त देह आढळून आला वय अंदाजे 21 वर्ष त्यांनी त्वरित 112 वर कॉल करून पोलिसांना कळविण्यात आले व देवनला पोलीस पाटील विक्रम राठोड यांनी त्वरित कळब पोलीस स्टेशनला कळविण्यात आले त्वरित कळब ठाणेदार राजेश राठोड यांची संपूर्ण टीम घटनास्थळी दाखल झाले व फॉरेन्सिक टीमला पाचारण करण्यात आले त्यांनी घटनास्थळी पंचनामा करून व फॉरेन्सिक टीम द्वारे पंचनामा करण्यात आला घटनास्थळी बिना मुठे चाकू लाल रंगाची नॅपकिन आठ नंबर लेडीज चप्पल घड्याळ व जेन्ट कमरेचा पट्टा व पाय पट्टी घटनास्थळी आढळून आले व दगडावरील सांडलेले रक्त पंचनामा करण्यात आला.