Home यवतमाळ कळंब शहर बनले अवैध धंद्याचे माहेरघर “पोलिसांच्या आशीर्वादाने” दारू, वरली मटका व...

कळंब शहर बनले अवैध धंद्याचे माहेरघर “पोलिसांच्या आशीर्वादाने” दारू, वरली मटका व भिंगरी जोमात…!

496
अवैध दारूमुळे अनेकांची संसार रस्त्यावर तर सर्रास वर्धा व देवळी येथे रात्रीच्या अंधारात दारू पार्सल
 यवतमाळ – कळंब शहरातील सर्वच अवैध धंदयांना पोलिसांच्या आशीर्वादाने चांगलाच उत आल्याची चर्चा सध्या कळंब शहरात होत येथील स्थानिक पोलीस प्रशासन व एल सि बी यंत्रणा मात्र बघ्याची भुमिका घेऊन बसल्याचे चित्र दिसत आहे.
कळंब शहरातील मागील काही दिवसा पासून वरली मटक्याचे तीन काउंटर व त्यासोबतच भिंगरीचे मोठे रँकेट सक्रीय असुन जिल्ह्यातील एल सि बी यंत्रणा मात्र निकामीच दिसत असा सुरू आहे. आपल्याला ठरल्याप्रमाणे हप्ता मिळत असल्याने कोणीही कारवाई करीत नसल्याचे बोलले जात आहे. शहरातील घरफोडी गोवंश तस्करी, जुगार, वरली मटका व रात्रीच्या वेळी होणारी अवैध दारू आणि रेती यासारखे अवैध धंदे सर्रासपणे सुरू आहे. त्यामुळे शहरातील कायदासुवस्था धोक्यात आली असुन पोलीस प्रशासन मात्र या कडे मुद्दाम दुर्लक्ष करत असल्याचे चित्र स्पष्ट आहे.
कळंब शहर हे पुरातन काळापासून धार्मिक स्थळ असुन विदर्भाचे अष्टविनायक अशी ख्याती आहे. अशा धार्मिक नगरीत अवैध धंदेवाल्यांनी चांगले बस्तान मांडले आहे यातूनच गुन्हेगारी निर्माण होण्याचे चित्र दिसत आहे.
मंदिराच्या डाव्या बाजूला असलेल्या इंदिरा चौक, अन्नाचे शासकीय गोदाम असलेल्या शिवाजी चौक येथे वरली मटक्याचे मोठे असल्याने वर्दळीच्या लोकांना रस्तावर गाड्या उभ्या करून मटका खेळण्यात मग्न असतात वरली मटके वाल्यांनी तर आता नवीनच शक्कल लढवली आहे, आता तर सरळ मोबाईल फोनवर मटका घेऊन व्हँटसप द्वारे ग्राहकांच्या मोबाईल मध्ये दिला जातो.
रात्रीच्या वेळी शहरातील अवैध दारू विक्रेते आपला व्यवसाय त्याचप्रमाणे रेती तस्करी मात्र राजरोस पणे सुरू आहे. कळंब ठाणेदार यांना जनतेने किंवा पत्रकारांनी सांगावे तेव्हा कारवाई करणार “का” असा प्रश्न आता सामान्य नागरिकांपुढे उभा आहे.
वरील सर्व बाबी कडे संबंधित वरिष्ठ अधिकारी व पोलीस अधीक्षक यांनी गांर्भियाने लक्ष घालून कळंब शहरात होत असलेल्या अवैध धंदाना लगाम लावावा अशी मागणी जोर धरत आहे.