Home यवतमाळ प्रजासत्ताक दिन व हळदी कुंकू याचे औचित्य साधून प्रियंका लुंगे आणि टीम...

प्रजासत्ताक दिन व हळदी कुंकू याचे औचित्य साधून प्रियंका लुंगे आणि टीम एक आगळावेगळा कार्यक्रम

203
यवतमाळ  – प्रजासत्ताक दिन व हळदी कुंकू याचे औचित्य साधून प्रियंका लुंगे आणि टीम एक आगळावेगळा प्रोग्राम जो की खऱ्या अर्थाने महिलांना आर्थिक स्वातंत्र्य त्याचप्रमाणे स्वतःची ओळख निर्माण करण्यास ‘स्त्री शक्ती ही जगाची जननी आहे ‘हे खूप छान प्रकारे वेगवेगळ्या प्रात्यक्षिक करण्यातून महिलांमध्ये असलेल्या कलागुणांना वाव देऊन आणि त्यांच्या मधला चांगुलपणा ओळखून या प्रोग्रामला 200 पेक्षा अधिकमहिला उपस्थित होत्या मीरॅकल टीम अमरावती संयोजक पंकज आणि प्रिया लुंगे ्यांनी एक उत्तम वुमन्स एम्पॉवरमेंट चा प्रोग्राम हॉटेल विरसा येथे आयोजित केला . कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण हे शिवाजी महाराजांचा पोवाडा, शंखनाद, इच्छापूर्ती पतंग तसेच लाठीकाठी आणि तलवारबाजी हे ठरले.आणि विशेष आकर्षण ठरलं ते पुस्तकं रुपी वाण. वां तर सगळेच देतात पण पुस्तकं या करिता,
जेंणे करूनबुद्धीमध्ये वाढ झाली पाहिजे आणि पुस्तकांच्या रूपात नवीन मित्र मिळायला पाहिजे.
प्रियंका मॅडम या नेहमीच महिलांसाठी, त्यांना पुढे आणण्यासाठी, त्यांना घरातून बाहेर काढण्यासाठी अग्रगणी असतात. त्याची प्रचिती क्षणोक्षणी या कार्यक्रमांमध्ये दिसत होती.
सारिका कोकाटे ्यांनी दिले कंगन पाण्याचे प्रात्यक्षिक, प्रियंका मॅमणी दिलेला business plan,.सौ …. नी समजावून सांगितलेला em Guard चे विवरण भरीस भर नरेंद्र केवले यांनी सादर केलेल्या शिवाजी महाराजांच्या पोवाड्यामुळे कार्यक्रमातील महिलांमध्ये स्फुरण चढले तसेच सौ रेणुका केवले यांनी केलेल्या शंखनादामुळे सगळ्याजणी प्रेरित झाल्या.

तसेच कार्यक्रमाचा उच्चांक गाठला तो आकाशात सोडण्यात आलेल्या इच्छापूर्ती पतंगाने सगळ्या महिलांनी आपल्या इच्छा त्या पतंगावर लिहिल्या असा इच्छापूर्तीचा इच्छांचा एक पतंग आपण आकाशामध्ये उंच झेपावला
सगळ्या महिलांच्या मनातले किंतु परंतु हे निघून गेलेत आणि त्या मोकळ्या झाल्या असा सगळा माहेरचा आनंद, स्फूर्ती घेऊन आपापल्या घरी एक नवी शक्ती घेऊन एक नवी प्रेरणा घेऊन एक नवी ऊर्जा घेऊन निघाल्या. प्रत्येक वर्षी अशा प्रकारचे हळदी कुंकू समारंभ समाजात व्हायला हवेत, स्त्री खऱ्या अर्थाने स्वावलंबी झाली पाहिजे एव्हकारिता ही सगळी उठठेव.

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सिल्वर कमिटी ने पुढाकार घेतला श्री पंकज लुंगे सर मिरॅकल सिस्टीम गोल्ड मेंबर (भारत)सचिन टाले, निलेश पर्सनकर ,शशांक लोमटे, शिवाजी कोकाटे,. तसेच ही बातमी मिळाली उमेश रामटेके एनॅजिक गोलबल डिस्ट्रीब्यूटर याचा कडून. धन्यवाद