Home यवतमाळ कळंब तालुक्यात शेतीच्या वादातून खून…!

कळंब तालुक्यात शेतीच्या वादातून खून…!

847

गुन्हा नोंद करुन तपासात घेतला, आरोपी अटक असून तपास ठाणेदार विकास दांडे तपास मदत उपनिरीक्षक बोकडे , बिट जमादार धनंजय शेखदार करित आहे.

यवतमाळ – श्रीमती वनीता श्रीराम सुरपाम वय 45 वर्षे जात-कोलाम व्यवसाय-शेती रा. बेलोरी पोड ता.कळंब जि.यवतमाळ मी समक्ष पोलीस स्टेशन, वडगांव जंगल येथे येवुन जबानी रिपोर्ट देते कि, वरील पत्त्यावर पती श्रीराम लक्ष्मण सुरपाम असे मिळुन राहते व शेती काम करते. मला दोन मुले असुन मोठा प्रफुल व लहाण अतुल असे असुन ते वेगळे राहतात. आमची मौजा बेलोरी शेतशिवारात 3 एकर शेती असुन ती शेती माझे पती श्रीराम लक्ष्मण सुरपाम याचे नावाने आहे. तसेच मौजा उमरपोड शेतशिवारात माझे पतीची वडीलोपार्जीत शेती आहे परंतु त्या शेतीचा कागदोपत्री वाद असुन ती शेती माझे नावावर करा म्हणुन संभा धर्माजी गाडेकर रा. बेलोरी हा माझ्या पतीशी नेहमी वाद घालत होता. आम्हाला सुद्धा प्रकरण वाढवायचे नव्हते म्हणुन आम्ही पोलीस स्टेशनला तक्रारी न देता गाव स्तरावर मिटवित होतो व 8 दिवसापुर्वी संभा धर्माजी गाडेकर याने माझे पतीसोबत त्याच कारणावरुन भांडण केले होते शेती माझ्या नावावर नाही केली तर तुला पाहुण घेण्याची धमकी दिली होती. काल दिनांक 12.01.2026 रोजी सकाळी 11.00 वाजता माझे पती श्रीराम हे गणेशपुर येथे नातेवाईकांकडे गेले असता सायंकाळी 07.00 वाजता सुमारास संभा गाडेकर हा माझे घरी येवुन पती श्रीराम हे कुठे गेला म्हणुन विचारला असता मी त्याला गणेशपुर येथे गेले असल्याचे सांगीतले. तेव्हा तो रागात असल्याचे दिसले.
दिनांक 13.01.2026 रोजी सकाळी 09.00 वाजता सुमारास माझा पुतण्या विनोद गजानन सुरपाम हा धावत माझे घरी येवुन म्हणाला की, मोठे बाबा श्रीराम सुरपाम यांना खुन करुन आपल्या शेतात आणुन टाकुन दिले आहे. त्यावरुन मी व पुतण्या विनोद असे आमचे शेतात जावुन पाहिले असता पती श्रीराम लक्ष्मण सुरपाम याचे प्रेत कापसाचे शेतातील तुरीचे ओळीत पडुन होते व प्रेत ओढत आणुन टाकल्याचे निशान दिसत होते. पतीचे डोक्यावर, तोंडावर व शरिरावर दगडाने मारल्याच्या जखमा दिसत होत्या. तरी माझे पती नामे-श्रीराम लक्ष्मण सुरपाम वय 50 वर्षे यांना संभा धर्माजी गाडेकर वय 48 वर्षे जात कोलाम रा. बेलोरी यानेच शेत नावावर करण्याच्या जुण्या वादातुन दगडाने गंभीर जखमी करुन यांचा खुन करुन प्रेत आमचे शेतात आणुन टाकले. म्हणुन माझी त्याच्याविरोधात कारवाई होण्यास जबानी रिपोर्ट देत आहे. असे फिर्यादीचे जबानी रिपोर्ट वरुन सदरचा गुन्हा नोंद करुन तपासात घेतला.