Home महत्वाची बातमी वाशिम येथे महिलेच्या ब्लात्कार खुनप्रकरणी आरोपी अवघ्या चोवीस तासात जेरबंद

वाशिम येथे महिलेच्या ब्लात्कार खुनप्रकरणी आरोपी अवघ्या चोवीस तासात जेरबंद

469

 

वाशिम पोलिसदलाची कर्तव्यतत्परता

फुलचंद भगत
वाशिम:-पोलीस स्टेशन वाशिम शहर हद्दीत रेल्वे स्टेशन परीसरात एक अनोळखी महिलेचा मृतदेह असल्या बाबत माहिती मिळाल्या वरुन स्थानिक गुन्हे शाखा वाशिम तसेच पोलीस स्टेशन वाशिम शहर व उपविभागीय पोलीस अधिकारी वाशिम येथील टिम घटनास्थळी पोहचले. सदर महिलेच्या डोक्यात दगड मारुन हत्या केल्याचे निष्पन्न झाले. सदर ठीकाणी वरिष्ठांनी भेट दिली. उपस्थीत सर्व अधिकारी व कर्मचारी यांना मार्गदर्शन व योग्य सुचना देवुन वेगवेगळ्या टिम तयार करुन रवाना केल्या. मृत महिलेची व अनोळखी आरोपीची ओळख पटवणे अवघड असल्याने वेगवेगळ्या बातमीदारांना सक्रिय करण्यात आले. अनोळखी महिलेची ओळख पटवुन तिची हत्या कोणी व का केली ह्या बाबत महिती काढुन आरोपीचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरु करण्यात आले.
संध्याकाळी उशिरा मृतक महिला हि पंचशिल नगर वाशिम येथील असल्याचे निष्पन्न झाले. परीसरातील 40 च्यावर सिसिटिव्ही फुटेज चेक करण्यात आले. त्यावरुन एक संशयित इसम आढळुन आल्याने स्थानिक गुन्हे शाखा वाशिम येथील टिम ने गोपनिय यंत्रणा सतर्क करुन आरोपीचा शोध घेतला, तेव्हा सदर संशयित आरोपी हा वाशिम येथील रहीवासी नसल्याचे निष्पन्न झाल्या नंतर वाशिम शहरातील रिसोड नाका येथील मजुर अड्डा, बस स्टँड व रेल्वे स्टेशन याठिकाणी जावुन माहिती घेण्यात आली. त्याच प्रमाणे आरोपी गुन्हा केल्या नंतर रेल्वेने अकोला येथे जाण्याची शक्यता असल्याने एक टिम अकोला येथे रवाना करण्यात आली होती. सदर टिम ने अकोला परीसरात शोध घेतला असता सदर संशयित आरोपी हा दर्यापुर जि. अमरावती येथील एका खेड्यातील रहीवासी असल्याची प्राथमीक माहिती मिळाली. करीता संशयित आरोपीचा शोध घेणे करीता त्याचे गावामध्ये टिम रवाना केली. परंतु आरोपी हा मागील काही दिवसापासुन गावात नसल्याचे समजले. अकोला येथे असलेल्या स्थानिक गुन्हे शाखा वाशिम येथील टिम ने रात्रीपासुन सर्च मोहिम राबवुन सदर संशयित आरोपीस आज दिनांक 10/01/2026 रोजी अकोला रेल्वे स्टेशन परीसरात येताच सदर आरोपीस ताब्यात घेतले. त्यास विश्वासात घेवुन विचारपुस केली असता आरोपी नामे संतोष रामराव खंडारे रा. अडुळा बाजार ता. दर्यापुर जि. अमरावती याने सदर गुन्हा केल्याची कबुली दिल्याने त्यास ताब्यात घेवुन वाशिम येथे आणले.
सदर कारवाई श्री. अनुज तारे, पोलीस अधीक्षक वाशिम, मा. लता फड, अपर पोलीस अधीक्षक वाशिम, व श्री. नवदीप अग्रवाल, उपविभागीय पोलीस अधिकारी वाशिम यांच्या मार्गदर्शनाखाली, पो.नि. प्रदीप परदेशी, संजय चौधरी, सपोनि योगेश बांगर यांचे सह स्थानिक गुन्हे शाखा वाशिम व पोलीस स्टेशन वाशिम शहर येथील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी अथक परिश्रम घेवुन 24 तासाच्या आत गुन्हा उघडकीस आणुन आरोपीस अटक केले. सदर गुन्ह्याच्या उकल संदर्भात पोअंम / राजकुमार यादव, संदिप दुतोंडे, अमोल इरतकर व दिपक घुगे चापोशी/ सुनिल तायडे यांचे विशेष योगदान राहले आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास सपोनि/ अरुन नागरे पोलीस स्टेशन वाशिम शहर हे करीत आहे.