Home बुलडाणा दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने दोनजण जागीच ठार

दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने दोनजण जागीच ठार

565

 

 

रविंद्र जाधव

देउलगाव राजा

जालना-चिखली महामार्गवरील खडकपूर्णा नदीच्या पुलाजवळ सुसाट वेगाने असलेल्या
दुचाकीस्वाराचे नियंत्रण सुटल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार कारभारी तुळशीराम पैठणे वय ४२, कारभारी संपत बनसोडे ४८ दोघेही रा धोत्रा नंदई, ता. दे.राजा यांचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याची घटना आज दि. २ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजता दरम्यान घडली.
याबाबत प्राप्त माहितीनुसार कारभारी बनसोडे व कारभारी पैठणे हे दोघे मोटारसायकलने देऊळगाव राजा वरून देऊळगाव महीकडे येत असताना खडकपूर्णा नदीच्या पुलाजवळ त्यांच्या ताब्यात असलेल्या मोटारसायकल वरील नियंत्रण सुटले यामध्ये दोघेही मोटासायकलसह पुलाच्या बाजूला कोसळले हा अपघात इतका भीषण होता यामध्ये दोघांचाही घटनास्थळी मृत्यू झाला असून मोटारसायकलचा अक्षरशः चुराडा झाला आहे. या अपघाताची माहिती देउलगाव महि पोलीस चौकीचे पोलिस हेड कॉन्स्टेबल कलीम देशमुख, शरद साळवे, नागरे यांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन अपघाताची पाहणी केली. व दोघांचे मृतदेह शव विछेदना साठी रवाना केल्याची माहिती प्राप्त झाली आहे ,