Home यवतमाळ यवतमाळ नगर परिषद निवडणुक पुढे ढकलली??

यवतमाळ नगर परिषद निवडणुक पुढे ढकलली??

586
यवतमाळ मधील दिग्रस पांढरकवडा व वणी येथील काही प्रभागांची निवडणूक लांबणीवर जाण्याची चिन्हे आहेत. याबाबत अद्याप निवडणूक आयोगाकडून अधिकृत माहिती समोर आलेली नाही. ज्या ठिकाणी तांत्रिक चुका झाल्या तेथे निवडणुकी संदर्भात निवडणूक आयोगानं नव्याने कार्यक्रम दिला असून आता निवडणुक दिनांक 20 डिसेंबरला होणार आहेत. निवडणूक प्रक्रिया लांबणीवर पडण्यामागे न्यायालयीन कारण असल्याचे समोर आले आहे. याबाबत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून अद्याप कुठलीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
तसेच नगर पालिका निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाची यंत्रणा सज्ज झाली असून नगर परिषद आणि नगर पंचायतींच्या निवडणुकांसाठी एकूण 1 कोटी 7 लाख 3 हजार 576 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यासाठी सुमारे 13 हजार 355 मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली. या निवडणुकांसाठी ईव्हीएम मशीनचा व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे 13 हजार 726 कंट्रोल युनिट आणि 27 हजार 452 बॅलेट युनिटची उपलब्धता करण्यात आली आहे.
राज्यातील 246 नगर परिषदा तर 42 नगर पंचायतींच्या ( एकूण 288 ) सदस्यपदासाठी आणि थेट अध्यक्ष पदाच्या सार्वत्रिक निवडणुकांकरिता दिनांक 2 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. 2 डिसेंबरला सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 पर्यंत मतदानाची वेळ असणार आहे. तर मतमोजणी दिनांक 3 डिसेंबरला सकाळी 10 वाजता सुरु होणार आहे.