
हिवरा आश्रम : श्रावण मास कावड यात्रा पोळा श्रीकृष्ण जन्माष्टमी गणेशोत्सव ईद.ए. मिलाद तथा आदी सण उत्सव शांततेत पार पाडल्याबद्दल विवेकानंद आश्रमाच्या वतीने साखरखेर्डा पोलीस स्टेशनचे ठाणेदार गजानन करेवाड आणि सौ कल्पना गजानन करेवाड यांचा दिनांक 20 सप्टेंबर रोजी शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सपत्नी गौरव केला यावेळी विवेकानंद आश्रमाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापक अशोकभाऊ थोरहाते सचिव संतोष गोरे पत्रकार समाधान म्हस्के गंगाधर निकस गुरुजी शाहीर ईश्वर दादा मगर तथा आदी हजर होते तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी देखील दिनांक 17 सप्टेंबर रोजी ठाणेदार करेवाड यांच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकून सन्मानपत्र देऊन सन्मानित केले सण उत्सव काळात मिरवणुकीत कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून ठाणेदार करेवाड यांनी चोख बंदोबस्त ठेवून ईद-ए-मिलाद गणेशोत्सव मिरवणुकीला गालबोट लागू दिले नाही एवढे मात्र खरे











































