Home बुलडाणा चिखलीत स्टेट बैंक ऑफ इंडिया चे ए टी एम फोडून लाखोची रोकड़...

चिखलीत स्टेट बैंक ऑफ इंडिया चे ए टी एम फोडून लाखोची रोकड़ लंपास ,

280

 

 

बुलडाणा ,

चिखली शहरातील राऊत वाडी परिसरात शनिवारी (२० सप्टेंबर) पहाटे दोन ते तीन वाजेदरम्यान स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) चा एटीएम अज्ञात चोरट्यांनी गॅस कटरने फोडत दहा लाखांहून अधिक रोकड लंपास केली. दुपारनंतर ही धाडसी चोरी उघडकीस येताच परिसरात मोठी खळबळ उडाली.

मिळालेल्या माहितीनुसार, चोरट्यांनी एटीएममधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांवर रंगाचा स्प्रे मारून ते निष्क्रिय केले. त्यानंतर वायरींग कापून संपूर्ण सुरक्षा यंत्रणा निकामी करण्यात आली. सर्व अडथळे दूर करत चोरट्यांनी गॅस कटरच्या सहाय्याने एटीएम मशीन फोडले व रोकड उचलून नेली.
घटनेची माहिती आज दुपारी मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. फिंगरप्रिंट एक्सपर्ट व डॉग स्क्वॉडच्या मदतीने पुरावे गोळा करण्याचे काम सुरू असून, अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या एटीएम फोड प्रकरणामुळे बँक ग्राहकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांच्या गस्त व सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.