Home अमरावती शिवाजी महाविद्यालयाच्या पत्रकारिता विद्यार्थ्यांचा अमरावती मध्यवर्ती कारागृह येथे अभ्यासदौरा

शिवाजी महाविद्यालयाच्या पत्रकारिता विद्यार्थ्यांचा अमरावती मध्यवर्ती कारागृह येथे अभ्यासदौरा

258

कारागृह अधीक्षक किर्ती चिंतामणी यांनी केले मौलिक मार्गदर्शन

अमरावती : श्री शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या पत्रकारिता व जनसंवाद विभागातील विद्यार्थ्यांनी अमरावती मध्यवर्ती कारागृहाचा अभ्यासदौरा केला. या दौऱ्यात विद्यार्थ्यांना कारागृह प्रशासनाची कार्यपद्धती, बंदीवासांचे जीवन आणि सुधारणा प्रक्रियेची सखोल माहिती मिळाली.

कारागृह अधीक्षक किर्ती चिंतामणी यांनी विद्यार्थ्यांना कारागृहातील नियम, शिक्षण व रोजगाराच्या सुविधा तसेच सामाजिक पुनर्वसनाबाबत मार्गदर्शन केले. तुरुंग शिक्षक संजय घोलप व प्रमोद धर्माळे यांनी कारागृहातील विविध विभागांची माहिती दिली. सदर भेटीसाठी लागणाऱ्या परवानगी प्रक्रियेत ललित मुंडे यांनी विशेष मदत केली.

विद्यार्थ्यांनी कारागृहात राबविण्यात येणाऱ्या हस्तकला, शिल्पकला आणि कार्यशाळांचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. त्यामुळे बंदीवासांच्या सुधारणा आणि पुनर्वसन प्रक्रियेबाबत त्यांना प्रत्यक्ष ज्ञान मिळाले.

या अभ्यासदौऱ्याचा उद्देश विद्यार्थ्यांना केवळ शैक्षणिक माहिती देणे नसून समाजातील संवेदनशील मुद्यांविषयी जागरूक करणे हा होता. पत्रकारितेच्या दृष्टीने हा अनुभव विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरला.

हा दौरा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अंबादास कुलट, विभाग प्रमुख डॉ. कुमार बोबडे तसेच प्रा.गजानन गडेकर, प्रा.प्रतीक करंडे, प्रा. रूपेश फसाटे, प्रा.मनीष भंकाळे, प्रा. शिवकुमार साबळे, प्रा. डॉ. नकुल धरमकर, , प्रा. मनीषा देशमुख, प्रा.सर्वेश मराठे आणि श्याम पिंजरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.