
अमरावती: (अमित कुळवंत)
शुक्रवार , दिनांक: ०७/११/२०२५
श्री.शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालयातील पत्रकार विभागाच्या विद्यार्थ्यांचा गाडगे नगर पोलीस स्टेशनला प्रा.श्री.मनीष भंकाळे यांच्या नेतृत्वामध्ये क्षेत्रभेटीचे आयोजन करण्यात आले होते. या भेटीदरम्यान गाडगे नगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.अतुल राव यांच्यासोबत विद्यार्थ्यांची पोलीस प्रशासन व्यवस्था , आधुनिक पोलिसिंग, बाल गुन्हेगारी , पोलिसांसमोरील वाढते आव्हाने आणि या संबंधित अनेक विषयांवर विस्तृत चर्चा झाली.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक राव यांनी अतिशय मनमोकळेपणाने विद्यार्थ्यांच्या सर्व प्रश्नांचे निरासरण केले आणि सोबतच कर्तव्य बजावत असताना आपल्या वैयक्तिक जीवनामधील अनेक उदाहरणे त्यांनी यावेळी सांगितली. ज्या माध्यमातून विद्यार्थ्यांना वास्तवदर्शी अनुभव व पोलीस खात्या संदर्भात असलेल्या विविध आयमांशी परिचय होण्यास मदत झाली. सध्या परिस्थितीमध्ये डिजिटल अरेस्ट , सामाजिक माध्यमे, ऑनलाइन फ्रॉड आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून वाढत असलेल्या गुन्हेगारी व आर्थिक फसवणूक यासंदर्भातील विविध विषयांवर विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना अतिशय सटिक उत्तरे यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल राव यांनी दिली. पत्रकारीता हे लोकशाहीचे चौथे आधारस्तंभ असून त्यांची भूमिका अनन्यसाधारण स्वरूपाची असल्याचे मत गाडगे नगर पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्री.अतुल राव यांनी यावेळी व्यक्त केले. क्षेत्रभेटीच्या शेवटी प्राचार्य श्री.मनीष भंकाळे यांनी सर्वांचे आभार मानून क्षेत्रभेट समाप्त झाली.











































