Home बुलडाणा गणपती विसर्जनाकरिता गेलेल्या तरुणाचा तलावात बुड़ुन मृत्यू

गणपती विसर्जनाकरिता गेलेल्या तरुणाचा तलावात बुड़ुन मृत्यू

501

 

अमिन शाह

बुलडाणा ,

सार्वजनिक गणपती बुडवण्यासाठी पाण्यात उतरलेल्या आठ ते दहा तरुणांपैकी एकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला तर मंडळ कार्यकर्त्यांच्या समय सूचकतेमुळे दूसरा बचावला. ही घटना काल खामगांव तालुक्यातील हिवरखेड पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या वझर येथे घडली. घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे.

याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पवन गणेश मोहीते वय 21 वर्ष रा. वझर हा गणपती विसर्जन करण्या करिता मंडळातील 7 ते 8 लोकांसोबत गणेश मुर्ती ला पाण्यामध्ये घेवुन जावुन विसर्जन करण्याकरिता गेला होता. तो परत आला नाही व गावातील लोक परत आले .मुर्ती पाण्यामध्ये सोडत असतांना तलावात पाण्यावर हात दिसल्याने व त्यांच्यासोबत असलेला एक मुलगा बुडत असल्याने त्याला बेशुध्दावस्थेत बाहेर काढले त्यानंतर मंडळाचे व उपस्थीत लोकांनी त्याची छाती दाबुन पाणी बाहेर काढले त्यावेळेस तो मुलगा शुध्दीवर आला. त्याचे नाव रोशन नामदेव मोहीते असे असल्याचे समजले. त्यानंतर त्याच्यासोबत आणखी एक मुलगा नामे पवन गणेश मोहीते क्य 21 वर्ष असा असल्याचे मंडळाचे व विसर्जन करण्याकरीता पाण्यामध्ये गेलेल्या लोकांच्या लक्षात आल्याने त्याचा पाण्यामध्ये जावुन शोध घेतला असता तो पाण्याचा अंदाज न आल्याने व त्याला पाण्यात पोहता येत नसल्याने तो खोल पाण्यात बुडुन मरण पावला त्याचा गावातील लोकांनी तलावातील पाण्यामध्ये खुप शोध घेतला परंतु अंधार असल्याने व पाणी जास्त असल्याने त्यांचा शोध घेता आला नाही त्यानंतर थोड्या वेळाने त्याला गावातील लोकांचे व SDRF चे टीमचे मदतीने पाण्याचे बाहेर शोधुन काढले तेव्हा तो पाण्यात बुडुन मरण पावला होता. याबाबत हिवरखेड पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.