Home बुलडाणा प्रेमात अडसर ठरणाऱ्या तरुणाच्या खून प्रकरणी महिला प्रदेशअध्यक्षाला साखरखेर्डा येथून अटक ,

प्रेमात अडसर ठरणाऱ्या तरुणाच्या खून प्रकरणी महिला प्रदेशअध्यक्षाला साखरखेर्डा येथून अटक ,

1408

 

 

अमीन शाह ,

बुलडाणा ,

छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद : येथे काही दिवसापासून बेपत्ता असलेल्या 32 वर्षीय तरुणाचा मृतदेह अखेर गोदापात्रात आढळल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. छावा संघटनेतच काम करणाऱ्या प्रदेशाध्यक्ष महिलेने प्रेमात अडसर ठरतो म्हणून भाऊ आणि मित्राच्या मदतीने तरुणाचा खून केल्याचा आरोप आहे. छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद येथे काळजाचा थरकाप उडवणारं हत्याकांड समोर आलं आहे.

या संदर्भात मिळालेल्या माहिती नुसारसचिन पुंडलिक अवताडे, वय 32 वर्ष, राहणार हर्सूल, असे खून झालेल्या तरुणाचं नाव आहे. तर भारती रवींद्र दुबे, वय 34, राहणार कॅनॉट पैलेस मामेभाऊ दुर्गेश तिवारी, खुलताबाद अशी आरोपींची नाव आहे.

काय आहे प्रकरण?

या प्रकरणी अधिक माहिती अशी की, भारती ही पतीपासून विभक्त झाल्यानंतर कॅनॉट प्लेस येथे राहते. भारती व सचिन हे दोघे चार वर्षापासून छावा संघटनेत काम करत होते. त्यांची या काळत ओळख झाली आणि मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. 31 जुलै रोजी दोघांनी दारू खरेदी केली. कॅनॉट प्लेस येथील फ्लॅटवर गेले. तिथे भारतीचा मामेभाऊ दुर्गेश आला. त्यानंतर मित्र अफरोज देखील फ्लॅटवर आला. याच दरम्यान त्यांच्यात वाद झाला. तिघांनी मिळून सचिनला बेदम मारहाण करत चाकूने हल्ला केला व त्यास मारून टाकले ,

कुटुंबाने दिली बेपत्ता असल्याची तक्रार ,

सचिन 31 जुलैपासून बेपत्ता होता. त्याच्या नातेवाईकांनी शोध घेतला मात्र तो सापडला नाही. त्यानंतर कुटुंबाने हर्सूल पोलीस ठाण्यामध्ये बेपत्ता असल्याची तक्रार दिली. दरमियान13 ऑगस्ट रोजी शेवगाव तालुक्यातील मुंगी येथे गोदावरी पात्रात त्याचा मृतदेह आढळला. सचिनच्या मानेवर व हातावर असलेल्या टॅटू वरून त्याची ओळख पटली.
सचिन बेपत्ता होता तेव्हापासून भारतीही फ्लॅटवरून पसार झाली होती. पोलिसांनी 80 सीसीटीव्ही फुटेज तपासले असता तिघेजण ताडपत्रीमध्ये मृतदेह घेऊन जाताना दिसून आले. भारती बुलडाना जिल्ह्यातील साखरखेर्डा येथे एका शेतात लपून बसली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक वाघ यांना मिळाली. पथकाने रात्री एका शेतातून भारतीला ताब्यात घेतले असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी विचारपूस केली असता प्रेमसंबंधातील वादातून दुर्गेश व अफरोज यांच्या मदतीने सचिनचा खून केल्याची कबुली भारतीने दिली असल्याची माहिती मिळाली आहे ,