
गुलामगिरीच्या शृंखला तोडून मातृभूमीला स्वातंत्र्य करणारे नेताजी.
महानायक नेताजींच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन चर्चासत्र संपन्न.
बुलडाणा (अमीन शाह)
देशगौरव नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यामुळेच दीडशे वर्षाच्या गुलामगिरीची मानसिकता बाजूला सारून देशवासीयांमध्ये लढण्याचे सामर्थ्य आणि दुर्दम्य आशावाद निर्माण झाला. त्यामुळेच कधीही न मावळणाऱ्या ब्रिटिशांचा सूर्य अस्ताला गेला. त्याच विचारांची क्रांतिकारी शृंखला आझाद हिंद ने तीस वर्षापासून तेवत ठेवली. असे मत प्रख्यात विचारवंत वसंतराव व्यवहारे पाटील यांनी व्यक्त केले.
स्थानिक महानायक विचारमंच आणि नेताजी सुभाषचंद्र बोस विचार प्रेमी यांच्या संयुक्त विद्यमानाने सुभाष बाबूंच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन पर चर्चासत्राचे आयोजन 18 ऑगस्टला सायंकाळी दोन सत्रांमध्ये करण्यात आले होते. यावेळी समारोपीय सत्रात अध्यक्षीय मत व्यक्त करताना वसंतराव पाटील यांनी उपरोक्त विचारांची भावनांजली नेताजींना समर्पित केली. यावेळी आझाद हिंद शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड.सतीशचंद्र रोठे पाटील,रमाई ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्ष सुरेखाताई निकाळजे, आदिवासी परिषदेचे प्रदेशाध्यक्ष दिलीप मोरे,काँग्रेसच्या प्रवक्तासेलचे प्रदेश संयोजक रवी पाटील, भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांत बर्दे, जिल्हा सचिव अनंता शिंदे, ग्राम स्वराज्य समितीचे कमलाकर व्यवहारे, आझाद हिंद महिला संघटनेच्या जिल्हाध्यक्ष पंचफुलाबाई गवई, पत्रकार संजय काळे, भरत शर्मा, आदींची प्रमुख उपस्थिती होती. प्रथमता नेताजींना वंदन करून सामूहिक पुष्पांजली समर्पित करीत अभिवादन पर चर्चासत्राला सुरुवात करण्यात आली. उपस्थित सर्वच मान्यवरांनी यावेळी नेताजींच्या धकधकत्या जीवन पटावर अभ्यासपूर्ण मनोगत व्यक्त केले. तर प्रथम सत्रामध्ये योगेश तायडे यांच्या अध्यक्षतेत इंजी. शिवाजी जोहरे, भूपेश पाटील,निखिल राणे, आशाताई गायकवाड, सिंधुताई अहिर,शाम व्यवहारे, निकेश व्यवहारे,नारायणराव भाकडे, शेख अनिस, शेख गफार आदींची उपस्थिती होती. दोन्ही सत्राचे बहारदार संचलन व्याख्याते ॲड सतीशचंद्र रोठे पाटील यांनी केले. प्रास्ताविक राम व्यवहारे यांनी तर आभार प्रदर्शन निलेश ढकचवळे यांनी केले. यशस्वीतेसाठी अतुल सोनुने,विशाल राणे, सतीश हिवरकर,भारती अवचार, पान पाटील, शोभा मोरे, सविता इंगळे,संजय एंडोले,योगेश कोकाटे गणेश सनीसे यांच्यासह महानायक विचारमंच, आझाद हिंद शेतकरी संघटना, किसान ब्रिगेड, रमाई ब्रिगेड, मातृतीर्थ रणरागिणी संघटना, ग्राम स्वराज्य समिती, राष्ट्रीय बजरंग दल,आझाद हिंद महिला संघटना व शहरातील नेताजी प्रेमींनी दुपारी बारा ते सायंकाळी सात पर्यंत बहुसंख्येने उपस्थिती लावत यशस्वीतेसाठी अथक परिश्रम घेतले.
____
आझाद हिंद सेनेमुळे देशाला स्वातंत्र्य मिळाले.
चर्चासत्रातून नेताजींच्या क्रांतिकारी विचारांचा सूर.
देशगौरव नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा क्रांतिकारी विचार जनसामान्यांना आपलासा वाटला. त्यामुळेच गुलामगिरीत खिचपत पडलेल्या नागरिकांनी स्वतः जवळील सर्वस्व नेताजींना बहाल केले. अंगावरील दागिने मंगळसूत्र सुद्धा माता-भगिनींनी स्वातंत्र्यसंग्रामाच्या अग्नीकुंडात नेताजींना समर्पित केले. तर हजारो मातापित्यांनी सुभाषबाबूंच्या विश्वासावर आपल्या परिवारातील एक मुलगा, एक मुलगी आझाद हिंद सेनेमध्ये सामील केली. महिलांच्या फौजेतील संघटनाला नेताजींनी प्रथम चालना दिली.नेताजींच्या आझाद हिंद फौजमुळे आम्ही या देशाला स्वातंत्र्य देत असण्याची प्रथम पुष्टी तत्कालीन ब्रिटिश साम्राज्याचे ॲटर्नी जनरल यांनी आपल्या आत्मचरित्रात लिहून ठेवली. अंधकारमय जीवनात क्रांतीची मशाल तेवत ठेवणारी सुभाषबाबूंची विचारधारा आजही देशाला स्वयंभू महाशक्तीसाली बनवीण्यासाठी सक्षम आहे. या सह सुभाषबाबूंची राष्ट्रभक्ती, देशभक्ती,संघटन कौशल्य, वक्तृत्व, नेतृत्व आणि त्याग समर्पणाची भावना यावर उपस्थित सर्वच मान्यवरांनी अभ्यासपूर्ण मनोगत व्यक्त केले. स्मृतिदिनानिमित्त आयोजित चर्चासत्रात नेताजींच्या क्रांतिकारी विचाराचा इन्कलाब पुन्हा प्रज्वलित झाल्याची अनुभूती चर्चासत्रातील ज्वलंत आणि धगधगत्या विचारातून सभागृहात निर्माण झाली.











































