Home नागपूर डॉ वैशाली अटलोए यांची इस्रो च्या मेडिकल ऑफिसर पदी निवड

डॉ वैशाली अटलोए यांची इस्रो च्या मेडिकल ऑफिसर पदी निवड

416

Nagpur – भारतीय आयुर्वेद शास्त्र प्राचिन आणि मानवी जीवनासाठी पूरक आहे. आज जगानेही आपल्या आयुर्वेदाचे महत्त्व मान्य केले आहे. पण काही खात्यात आयुर्वेदाचा उपचार संबंधितांना हवा असतानाही तिथे त्याचे तज्ज्ञ उपलब्ध नव्हते. हीच बाब लक्षात घेता भारतीय अंतरिक्ष अनुसंधान संघटन अर्थात इस्त्रो अंतर्गत कार्यरत असलेल्या नागपुरातील राष्ट्रीय सुदूर संवेदन केंद्रातील कर्मचाऱ्यांना यापुढे आयुर्वेद उपचार आणि तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळणार आहे. त्याअनुषंगाने लष्करातील माजीसैनिकांना मोफत उपचार देणाऱ्या अन् कोरोना काळात देवदूत ठरलेल्या आयुर्वेद वाचस्पती डॉ. वैशाली अटलोए यांची वैद्यकीय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. केंद्रीय आरोग्य योजना अंतर्गत नागपुरातील क्षेत्रीय सुदूर संवेदन केंद्रात त्यांची नियुक्ती केली आहे. त्रिशा आयुर्वेद रुग्णालयाच्या संचालिका म्हणून डॉ. वैशाली अटलोए अनेक वर्षांपासून वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत आहेत. दीर्घ अनुभवी असलेल्या डॉ. वैशाली अटलोए यांनी सुदूर कोरोना काळात लोकहितासाठी दिलेली सेवा कायम स्मरणात राहील, अशीच होती.

*धन्वंतरीची कृपा प्रत्येकावर राहावी*

> आरोग्य हीच मानवाची संपत्ती मानली जाते. पण वर्तमानातील जीवनशैली खूपच तापदायक ठरत असल्याने अनेकांचे आरोग्य संकटात आहे. या स्थितीत आयुर्वेदाच्या मदतीने आपण नक्कीच सुदृढ आणि निरोगी जीवन जगू शकतो, अशी स्पष्ट भूमिका आयुर्वेद वाचस्पती डॉ. वैशाली अटलोए यांनी मांडली. आपण सर्वांनी वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत, शिशिर या सहा ऋतुंप्रमाणे आहार विहाराचे नियोजन केले तर आरोग्य नक्कीच चांगले राहील. नव्हे धन्वतरीची कृपा सर्वांवर राहील असेही डॉ. वैशाली अटलोए यांनी सांगितले.