
अमीन शाह
बुलढाणा ,
सौंदर्य, आत्मविश्वास आणि मेहनतीच्या जोरावर जागतिक स्तरावर आपली छाप पाडणाऱ्या शेगावच्या सुपुत्री, मिस एशिया वर्ल्ड 2025 विजेती गायत्री रोहनकर हिचा ‘मुंबई येथे हिंदुस्तान रत्न पुरस्कार’ देऊन भव्य सन्मान करण्यात आला.
मुंबई ग्लोबल अँड मुंबई इव्हेंट कंपनीच्या वतीने दिला जाणारा प्रतिष्ठित हिंदुस्तान रत्न पुरस्कार, दिनांक 18 जुलै रोजी मुंबई येथे आयोजित भव्य समारंभात गायत्रीला प्रदान करण्यात आला. या सोहळ्यात प्रसिद्ध सिने पार्श्वगायक उदित नारायण यांच्या हस्ते आणि राजकुमार तिवारी टिनू वर्मा यांच्यासह अनेक फिल्मसिटीतील अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत हा सन्मान देण्यात आला.
गायत्रीच्या पुरस्कार स्वीकाराच्या क्षणी संपूर्ण सभागृह टाळ्यांच्या गजरात दुमदुमून गेले. तिच्या यशाची दखल घेत अनेकांनी उभे राहून अभिवादन केले.
गायत्री रोहनकरने आजवर विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय सौंदर्य स्पर्धांमध्ये भाग घेऊन एकूण 18 पुरस्कार मिळवले आहेत. नुकत्याच दुबई येथे झालेल्या ‘एशिया वर्ल्ड 2025’ स्पर्धेत तिने विजेतेपद पटकावून भारताचे नाव उज्ज्वल केले.
शेगावसारख्या छोट्या शहरातून येऊन जागतिक मंचावर आपली ओळख निर्माण करणारी गायत्री रोहनकर आज देशभरातील तरुणींना प्रेरणा ठरत आहे.












































