Home यवतमाळ लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मृतिदिनानिमित्त नेत्रतपासणी व मोतीबिंदू शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद; जवळपास दोन...

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मृतिदिनानिमित्त नेत्रतपासणी व मोतीबिंदू शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद; जवळपास दोन हजार रुग्णांचा सहभाग

125

नितीन मिर्झापूरे मित्रपरिवार,व राजमुद्रा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य उपक्रम

यवतमाळ | दि.१८ जुलै.
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधत नितीन दादा मिर्झापूरे मित्रपरिवार व राजमुद्रा प्रतिष्ठान,यवतमाळ यांच्या वतीने,तसेच महात्मे नेत्रपेढी व नेत्र रुग्णालय,(एस.एम.एम.आय.)वेल्फेअर चारिटेबल ट्रस्ट,नागपूर यांच्या सौजन्याने भव्य नेत्रतपासणी,मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर व ५० वर्षांवरील गरजू रुग्णांसाठी मोफत चष्मे वाटप उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.या उपक्रमाचे आयोजन माँ भवानी मंगल कार्यालय,मांगूळ (ता.जिल्हा यवतमाळ) येथे आज दिनांक १८ जुलै(शुक्रवार) रोजी करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात डॉ.बाबासाहेब आंबेडकर,लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमांना माल्यार्पण करून करण्यात आली.यानंतर झालेल्या प्रास्ताविक भाषणात राजमुद्रा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष नितीन मिर्झापूरे यांनी सांगितले की,”समाजातील प्रत्येक गरजू व्यक्तीपर्यंत आरोग्याच्या सेवा पोहोचवणं हे आपलं आद्यकर्तव्य आहे.लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या लेखणीच्या माध्यमातून श्रमिक,उपेक्षित, वंचित घटकांच्या वेदना मांडल्या.त्यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून आम्ही या आरोग्य उपक्रमाचं आयोजन केलं आहे.
जसे अण्णाभाऊंनी लोकशाहीचा झेंडा हातात घेऊन सत्याच्या बाजूने लिहिलं,बोललं आणि लढा दिला,तसेच आज आपण समाजातील प्रत्येक अंध:कार दूर करण्याचा संकल्प केला पाहिजे.या शिबिराच्या माध्यमातून केवळ मोफत उपचार नाहीत तर एक सामाजिक जाणीव जनतेपर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे.”
शिबिरामध्ये रुई,वाई,बेलोरा,मांगूळ, बोरीगोसावी,भामराजा आदी गावांतील सुमारे २००० रुग्णांनी लाभ घेतला. मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी आवश्यक तपासण्या करण्यात आल्या,तर ५० वर्षावरील गरजू लाभार्थ्यांना मोफत चष्मे वाटण्यात आले.
या आरोग्य उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी रोहन पवार,कुंदन नागदेवते,गौरव अवझाडे,मनीष मनवर,कृष्णा इंगोले,क्रिश गुप्ता,योगेश खाडे,निशांत डिवरे,कुंदन पारटकर,हरीश शेबे,सुनील जाधव,सुमित गावंडे,प्रथमेश गिरी,विजय इंगळे,चंदू भारती,ओम कुदळे,विजय खेरे,अमन राऊत,हितेश इंगोले,सनी पीसे,विवेक स्थूल,राम पुराम, कृष्णा शेंडगे,चंदू राऊत,प्रफुल नेवारे,गजानन तिरमल्लू,अंकुश टाळीकुटे,प्रशिक नगराळे,अंकुश राजूरकर यांनी विशेष मेहनत घेतली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंकुश टाळीकुटे यांनी केले.
कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून ‘आरोग्याच्या वारी’त उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.या सहभागाबद्दल नितीन मिर्झापूरे यांनी उपस्थितांचे मनःपूर्वक आभार मानले.