Home यवतमाळ यवतमाळचा सुपुत्र मोहम्मद वसीम तगाले पहिल्याच प्रयत्नात CA उत्तीर्ण…!

यवतमाळचा सुपुत्र मोहम्मद वसीम तगाले पहिल्याच प्रयत्नात CA उत्तीर्ण…!

167

.यवतमाळ ( प्रतिनिधी ) – यवतमाळ शहरासाठी आज एक अत्यंत आनंदाची आणि अभिमानास्पद बातमी आहे. शहरातील रहिवासी मोहम्मद वसीम मोहम्मद शब्बीर तगाले यांनी प्रतिष्ठित चार्टर्ड अकाउंटंट (CA) – २०२५ ही परीक्षा पहिल्याच प्रयत्नात घवघवीत यश मिळवून उत्तीर्ण केली आहे. त्यांच्या या यशाने केवळ त्यांच्या कुटुंबालाच नव्हे, तर संपूर्ण यवतमाळ शहराला मोठा आनंद आणि अभिमान वाटत आहे.

मोहम्मद वसीम यांनी अथक परिश्रम, जिद्द आणि योग्य नियोजनाने हे यश संपादन केले आहे. CA परीक्षा ही देशातील सर्वात कठीण परीक्षांपैकी एक मानली जाते, आणि ती पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण करणे हे त्यांच्या बुद्धिमत्तेचे आणि मेहनतीचे द्योतक आहे.
त्यांच्या या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. मोहम्मद वसीम यांच्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.