Home यवतमाळ भांबोरा येथे गरजू विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकाचे वाटप.

भांबोरा येथे गरजू विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकाचे वाटप.

304

गावातील कर्मचारी वर्गाचा स्तुत्य उपक्रम.
—————————————-
घाटंजी (तालुका प्रतिनिधी) तालुक्यातील भांबोरा साईधाम येथिल विद्यार्थ्यांचे आपण काही देणे लागतो. येथिल विद्यार्थ्यामध्ये वाचन संस्कृतीचे प्रसार व्हावे, त्यांना वाचनाची सवय जडावी, परिस्थितीने तो खचून जाऊ नये, तो स्पर्धेत टिकून उंच भरारी घेत आपल्या पावलावर पाऊल टाकून गावाचे नावं झळकवावे अश्या एक नव्हे अनेक उदान्त हेतूने येथिल कर्मचारी ग्रुप एकत्र येऊन इयत्ता ९ वी व दहावीच्या ५१ विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकाचा संच व शालेय साहित्याचे वाटप नुकतेच एका कार्यक्रमाचे आयोजन करून स्तुत्य उपक्रम राबवून करण्यात आले.
. भांबोरा गावातील गावासह बाहेर जाऊन कार्य करणारे कर्मचारी वर्ग गेली पाच वर्षांपासून अविरत परिश्रम घेऊन शैक्षणिक सत्र सुरु होताच सर्व एकत्र येऊन या स्तुत्य उपक्रमाचे आयोजन करीत असतात. गावात गरजावंत विध्यार्थ्यांचा शोध घेऊन पाठ्यपुस्तकं, शालेय साहित्याचे वाटप करण्याचा वसा अंगीकारला आहे. एवढेच नव्हे तर गरजावंत विध्यार्थ्यांची जातीने लक्ष घालून शैक्षणिक क्षेत्रात येणाऱ्या अडचणी जाणून घेतल्या जाते. असाच एका सोहळ्याचे आयोजन करून पाठ्यपुस्तकासह रजिस्टर, कंपास पेटी, पेन असे साहित्याचे वाटप करण्यात आले. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी प्रा. प्रेम राठोड सर हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून विलास राठोड, अरुण जाधव,मनोज चव्हाण, बाबुलाल राठोड, पत्रकार विठ्ठल राठोड, यांची विशेष उपस्थिती होती. या प्रसंगी प्रा. प्रेम राठोड सर, अरुण जाधव, बाबुलाल राठोड यांनी मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले व हा उपक्रम असाच चालू ठेवण्याबाबत कर्मचारी ग्रुपच्या मान्यवरांना आवाहन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदिप राठोड यांनी केले तर सर्व उपस्थित मान्यवरांचे आभार विजय पवार यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आकाश राठोड व बबलू किसन राठोड यांनी अथक परिश्रम घेतले.

कोट
असा स्तुत्य उपक्रम गरजावंत विध्यार्थ्यांसाठी गावागावात राबविले जावे वाचन संस्कृतीला चालना मिळावी आणि यांत्रिकरणामधून (मोबाईल )विद्यार्थ्यांनी बाहेर “पडावे. वाचाल तरच वाचाल “
. प्रा. प्रेम राठोड सर