Home यवतमाळ कॅन्सरग्रस्त रुग्णाच्या जीवनात संजीवनी ठरले खासदार संजय भाऊ देशमुख यांचे सहकार्य –...

कॅन्सरग्रस्त रुग्णाच्या जीवनात संजीवनी ठरले खासदार संजय भाऊ देशमुख यांचे सहकार्य – पंतप्रधान सहायता निधीतून अडीच लाखांची मंजुरी.

174

यवतमाळ – मारेगाव (जि. यवतमाळ) येथील देवसिंग महादेव कोवे या गरीब कुटुंबातील व्यक्तीस अलीकडे कॅन्सरचा गंभीर आजार झाल्याने पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी शस्त्रक्रियेचा सल्ला दिला आणि उपचारासाठी तब्बल पाच लाख रुपयांची गरज भासू लागली. मात्र कोवे यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याने एवढी रक्कम उभी करणे कुटुंबासाठी अशक्यप्राय ठरू लागले. कुटुंबात चिंतेचं वातावरण निर्माण झालं.
अशा कठीण प्रसंगी कोवे यांचे नातेवाईक व सामाजिक कार्यकर्ते अभय चौधरी यांनी खासदार संजय भाऊ देशमुख यांची भेट घेतली.व कोवे यांच्या शस्त्रक्रियेसाठी मदत करण्याची विनंती केली असता सामाजिक भान असलेले, संकटग्रस्तांना नेहमी मदतीचा हात देणारे खासदार संजय भाऊ यांनी या विनंतीला तात्काळ प्रतिसाद दिला. त्यांनी स्वीय सहायक गजानन कदम यांना आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून पंतप्रधान वैद्यकीय सहायता निधीसाठी प्रस्ताव त्वरीत पाठवण्याचे निर्देश दिले.
गजानन कदम यांनी कोणतीही दिरंगाई न करता आवश्यक कागदपत्रे गोळा करून सातत्याने पाठपुरावा करत, दिल्लीपर्यंत पोहोचवले. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे पंतप्रधान सहायता निधीतून अडीच लाख रुपयांची आर्थिक मदत मंजूर करण्यात आली.
मंजुरी पत्र मिळताच कोवे कुटुंबीयांच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागले. त्यांनी संजय भाऊ देशमुख ,अभय चौधरी व गजानन कदम यांचे मनापासून आभार मानले आणि, “संकटाच्या काळात संजयभाऊ आमच्यासाठी देवासारखे धावून आले,” अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.
आज संजय भाऊंच्या मदतीमुळे कोवे यांच्यावर योग्य उपचार होण्याचा मार्ग मोकळा झाला असून, एका गरीब रुग्णाच्या जीवनात नवचैतन्य निर्माण झाले आहे. ही घटना म्हणजे खासदार संजय भाऊ देशमुख यांच्या लोकसेवेच्या संवेदनशील आणि प्रभावी नेतृत्वाचे जिवंत उदाहरण ठरते.