Home यवतमाळ पालकमंत्री संजय राठोड यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम…

पालकमंत्री संजय राठोड यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम…

185

शुभेच्छा देण्यासाठी जनतेची रीघ

यवतमाळ – शिवसेनेचे नेते, राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या वाढदिवसानिमित्त आज सोमवारी शिवसेनेच्या वतीने जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. पालकमंत्री संजय राठोड यांनी सर्वप्रथम सकाळी आपल्या गावी पहूर इजारा येथे जाऊन आई, वडिलांचे आशीर्वाद घेतले. त्यानंतर यवतमाळ येथे विश्रामगृहानजीक महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांच्या पुतळ्याचे अनावरण केले. त्यानंतर विश्रामगृह येथे राज्य व जिल्हाभरातून आलेले शिवसेनेचे पदाधिकारी, शिवसैनिक, विविध पक्षाचे नेते, मान्यवर व नागरिकांच्या शुभेच्छा स्वीकारल्या. याप्रसंगी त्यांच्या हस्ते विविध सामाजिक उपक्रमांचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी मंत्री संजय राठोड यांना शुभेच्छा देण्यासाठी नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती.