Home यवतमाळ मा जिजाऊ नगर परिषद शाळा क्रमांक 20 येथे प्रवेशोस्तव उत्साहात साजरा.

मा जिजाऊ नगर परिषद शाळा क्रमांक 20 येथे प्रवेशोस्तव उत्साहात साजरा.

194

➡️ आमदार माननीय बाळासाहेब मांगुळकर यांनी चिमुकल्यांचे केले स्वागत

सोमवार दिनांक 23 जुलै 2025 ला पीएमश्री मॉ जिजाऊ नगर परिषद शाळा क्रमांक 20 यवतमाळ येथे शाळा प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सर्वप्रथम वाजत गाजत शालेय परिसरात रॅली काढण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुणे यवतमाळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा.बाळासाहेब मांगुळकर तसेच नगरपरिषद यवतमाळ मुख्याधिकारी मा. शुभम क्यातमवार साहेब यांनी पहिलीतील नवागत विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. पाहुण्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना गणवेश व मोफत पाठ्यपुस्तकांचे व स्कूल बॅग वितरण करण्यात आले. शालेय परिसर फुगे व फुलांनी सजविण्यात आला होता. पाहुण्यांनी विद्यार्थ्यांची संवाद साधत त्यांचा उत्साह वाढवला. एक पेड मॉ के नाम उपक्रमांतर्गत शाळांमध्ये वृक्षारोपण करण्यात आले.आमदार मा.बाळासाहेब मांगुळकर तसेच मुख्याधिकारी मा. शुभम क्यातमवार साहेब यांनी नगरपालिकेच्या सर्व शाळांसाठी आवश्यक ती सर्व मदत करणार असल्याचे मार्गदर्शन प्रसंगी सांगितले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षा प्रशासन अधिकारी डॉ. शिल्पा पोलपेल्लीवर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रप्रमुख डॉ.विनोद डवले व डॉ.विलास काळे तसेच शाळेच्या माजी मुख्याध्यापिका सौ.निर्मला पांढरे मॅडम प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.प्राजक्ता वाघमोडे यांनी केले तर प्रास्ताविक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.वैजयंती भेंडारकर यांनी केले.आभार मंगला वनकर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षिका कल्पना जुनघरे, मनीषा बोनगीनवार, कविता डोंगरे, रेणुका ढोबे, प्राजक्ता बापट,शिक्षक श्री. नानाजी तलांडे ,लौकिक राठोड, महेश चांदोरे , रंजीत बांबल यांनी प्रयत्न केले.