
ब्रह्मपुरी/प्रतिनिधी
चंद्रपूर – उन्हाळ्यात नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे, असे म्हणत समस्या ऐकण्यासाठी शुक्रवारला ग्रामपंचायत कार्यालय गाठले. मात्र, तिथे सरपंच, उपसरपंच अथवा ग्रामसेवक अधिकारी नसल्याने पाणी नाही पिण्याला अन् ग्रामपंचायत कशाला, असा सवाल व्यक्त केला.
पारगांव येथील नळ पाणीपुरवठा योजना गेल्या
तिन महिन्यापासून ठप्प झाल्यामुळे ऐन उन्हाळ्यात नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. पारडगांव हे गाव ब्रह्मापुरीपासु ४ किलोमीटर अंतरावरा आहे या गावची लोकसंख्या सुमारे १७०० च्या घरात आहे. मात्र उन्हाळ्यात या गावासाठी पाणीपुरवठ्याचा स्त्रोत उपलब्ध नसल्यामुळे ग्रामस्थांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. गेल्या १० ते १२ वर्षाच्या कालावधीमध्ये पारडगांव येथे पाणीपुरवठा करण्यासाठी जलनिर्मल योजना, राष्ट्रीय ग्रामीण पाणीपुरवठा योजना, आदी योजनांद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी निधी मंजूर करण्यात आला. मात्र उभारून गावांना पाणीपुरवठा सुरळीत होत नसल्याने नागरिकांची पाण्यासाठी हाल होत आहेत.
पाणीपुरवठा देखील बंद झाला आहे. त्याची दुरुस्ती करण्याकडे ग्राम पंचायतचे दुर्लक्ष झाले आहे.












































