Home यवतमाळ मोदी सरकारच्या अकरा वर्षपूर्तीचे जिल्हामधे 250 चौपाल सभा घेणार – जिल्हाध्यक्ष ॲड....

मोदी सरकारच्या अकरा वर्षपूर्तीचे जिल्हामधे 250 चौपाल सभा घेणार – जिल्हाध्यक्ष ॲड. प्रफुल्ल चौहाण

285

यवतमाळ :- भारतीय जनता पार्टी यवतमाळ जिल्ह्याच्या वतीने विकसित भारताचा अमृत काळ सेवा, सुशासन व गरीब कल्याणाची मोदी सरकारचे अकरा वर्षांचे कार्यक्रम विविध उपक्रम व अभियानाने साजरा होणार आहे.
. मा. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी या देशात अंत्योदयासाठी कार्य करीत आहेत. देशात मागील अकरा वर्षात पायाभूत सुविधा निर्माण करण्यामध्ये त्यांनी मोठे कार्य केले आहे. तसेच विज्ञान-तंत्रज्ञानातही देशाने चौफेर प्रगती केली आहे. एवढेच नाही तर पहेलगाम हल्ल्या नंतर दहशतवाद्यांचे तळ उध्वस्त करून मिशन सिंदूर राबवून जगाला दाखून दिले की भारत देश कुठला ही अन्याय व दहशतवाद सहन करणार नाही. गाव खेड्यातील शेती, शेतकरी, शेतमजूर या सर्वांचे जिवनमान उंचावून या देशाला २०४७पर्यंत महासत्ता बनविण्याचे ध्येय उराशी ठेवून पंतप्रधान नरेंद्रजी मोदी हे कार्य करीत आहेत. त्यांचे हे कार्य, समाजातील तळागाळाच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचे काम भारतीय जनता पार्टी चे कार्यकर्ते मोदी सरकारचे अकरा वर्ष सेवा, सुशासन व गरीब कल्याणांची या संकल्प ते सिद्धी अंतर्गत विविध उपक्रम व अभियान घेत आहे.
. या मधे विविध व्यवसायिकांचे संमेलन होणार आहेत या संमेलनात शासनाशी संबंधीत विषयांवर चर्चा करण्यात येणार आहे
. विकासित भारत संकल्प अभियानांतर्गत
. शहरी भागात प्रभागशः चौक सभा, ग्रामीण भागात ग्रामपंचायतशः 250 चौक सभा आयोजित करून मोदी सरकारच्या 11 वर्षातील ऐतिहासिक निर्णय व कामगिरीची माहिती देण्यात येणार आहे.
. केंद्र व राज्य शासनाच्या योजनाचे लाभार्थी शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे.
. डिजिटल प्रतियोगिता घेण्यात येईल यामध्ये लहान व मोठे विडिओ व चित्रात्मक ग्राफिक्स संबंधी स्पर्धा आयोजन होणार असून जिल्हास्तरावर परिक्षण करून विजेत्यास पुरस्कार देण्यात येईल.
. पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी जींच्या नेतृत्वात अनेक ऐतिहासिक निर्णय व कामगिरीची प्रदर्शनी लावण्यात येणार आहे.
. मीडिया पॅनल चर्चा होणार असून मीडिया चॅनेल, यु टूब, ब्रोडकास्ट यावर मोदी सरकारच्या कामगिरीची माहिती देणारे व्हीडिओ तयार करण्यात येईल.
. 15 जून ते 20 जून योग प्रशिक्षण शिबीर. जिल्ह्यातील सर्व मंडळांमध्ये होणार असून 21 जून आंतरराष्ट्रीय योग दिवस मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येणार आहे.कार्यक्रमाच्या ठिकाणी पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी सरकारच्या कामगिरीचे चित्रप्रदर्शन भरवण्यात येईल
. जागतिक पर्यावरण दिन 5 जून पासून पुढील 2 महिने पर्यावरण संरक्षणासाठी वृक्षारोपण व बीज प्रत्यारोपण आदी कार्यक्रमांचे व्यापक अभियान करून मंडल, शहरी भागात प्रभाग व ग्रामीण भागात ग्रामपंचायत स्तरावर 25000 झाडांचे वृक्षारोपण व संगोपनाची जबाबदारी कार्यकर्ते घेणार आहेत
. 25 जून आणीबाणीला 50 वर्षे पूर्ण होणार असून 25 जून 1975-77 या या काळात श्रीमती इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वातील काँग्रेस सरकारने देशावर लादलेल्या आणीबाणी (काळादिवस) चे 50 वे वर्ष आहे. काँग्रेसने देशवासीयांवर केलेले अत्याचार, लोकशाहीची केलेली हत्या आजही लोकांच्या मनात जिवंत असून याविरोधात जिल्हास्तरावर काळादिवस म्हणून पाळणार असून यावेळी आणीबाणीसंबंधी माहिती देऊन या विषयासंबंधी चर्चासत्र आयोजित करणार आहे. आणीबाणीमध्ये अटक झालेल्याचा सन्मान करणार आहे.
25 जून डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांचा जयंती दिवस हा बलिदान दिवस म्हणून अभिवादन करणार आहेत.सर्व कार्यकर्त्यांना डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांचे देशाप्रती व पक्षाप्रती असलेले योगदान याबद्दलची माहिती प्रत्येक बुथवर देण्यात येणार आहे.
सर्व अभियान भाजपा जिल्हाध्यक्ष ॲड. प्रफुल्ल चौहान यांच्या नेतृत्वाखाली तर ना. अशोकराव उईके, आदिवासी विकास मंत्री, मदन येरावार, माजी मंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान राबवले जाणार आहे.या संकल्प ते सिद्धी या अभियानाचे संयोजक शंतनु शेटे सहसंयोजक- निर्मला विनकरे, धीरज शर्मा हे राहणार आहेत. असे भाजपा जिल्हा सरचिटणीस राजु पडगिलवार यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.