Home यवतमाळ हाय व्होल्टेज डीपीवर चिपकून माकडाचा मृत्यू – एम.एच.29 वन्यजीव संस्थेच्या तत्परतेने मृत...

हाय व्होल्टेज डीपीवर चिपकून माकडाचा मृत्यू – एम.एच.29 वन्यजीव संस्थेच्या तत्परतेने मृत माकड बाहेर काढले

270

यवतमाळ,दि.18 मे. – आज दिनांक 18 मे(रविवार) रोजी यवतमाळ,मेन लाईन मार्केट – मेट्रो फॅशन क्लबजवळील महाजनवाडी येथील जुन्या पंजाब नॅशनल बँकेच्या बाजूला असलेल्या हाय व्होल्टेज इलेक्ट्रिक डीपीवर माकड चिपकून मृत अवस्थेत आढळले.सदर घटनेची माहिती स्थानिक नागरिक सचिन येवले यांनी दिली.घटनेबाबत माहिती मिळाल्यावर मी रेंज फॉरेस्ट ऑफिसर अमर सिडाम यांना तत्काळ सूचित केले.त्यांनीही त्वरेने प्रतिक्रिया देत एम.एच.29 हेल्पिंग हॅन्ड वन्यजीव संस्थेचे अध्यक्ष निलेश मेश्राम यांना माहिती दिली.घटनेचे गांभीर्य लक्षात घेत एम.एच.29 टीमने घटनास्थळी धाव घेतली.तांत्रिक साधनांच्या अभावातही, संस्थेच्या स्वयंसेवकांनी बांबू व ग्रीन नेटचा वापर करून मृत माकडाला दक्षतेने बाहेर काढले.त्यांच्या या तत्परतेमुळे परिसरात संभाव्य विद्युत धोक्याची टाळणी झाली.या बचाव कार्यावेळी अजित गजभिये,जुनेद मलनस,शुभम तेलगोटे,महेश शेळके,बॉबी बगमारे,श्रेयश साकरगे,आणि प्रा. पंढरी पाठे यांची उपस्थिती होती.वन्यजीव व पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीने ही कारवाई महत्त्वाची ठरली असून, एम.एच.29 संस्थेच्या कार्यशैलीचे स्थानिक नागरिक व वनविभागाच्या वतीने कौतुक केले.

कोट–
“जेव्हा जेव्हा फॉरेस्ट डिपार्टमेंट वन्यजीव संरक्षणासाठी तत्परतेने सहकार्य करतं,तेव्हा मी मनापासून त्यांचं कौतुक करतो.अशा प्रसंगांमध्ये शासकीय यंत्रणा आणि सामाजिक संस्थांनी एकत्र येऊन काम केल्यास वन्यजीवांचे प्राण वाचवणे किंवा त्यांच्या मृत्यूमागील कारणांचा शोध घेणे अधिक प्रभावीपणे शक्य होतं.एम.एच. 29 संस्थेच्या कार्यसंस्कृतीला आणि अमर सिडाम यांच्या तात्काळ प्रतिसादाला मी विशेष दाद देतो.”
— प्रा.पंढरी पाठे(कृषी तथा वन्यजीव अभ्यासक,यवतमाळ)