Home यवतमाळ ढाणकी शहरातील अनधिकृत लेआउटचे एन ए रद्द करा अन्यथा काम बंद पाडण्याचा...

ढाणकी शहरातील अनधिकृत लेआउटचे एन ए रद्द करा अन्यथा काम बंद पाडण्याचा मनसेचा इशारा..

394

जिल्हाधिकारी, नगरविकास खात्याला मनसेचे निवेदन..

या अनधिकृत ले -आउट ला कोणाचा आशीर्वाद… मनसेचा सवाल.

ढाणकी शहरातील अनधिकृत लेआउट च्या संदर्भात १५ एप्रील रोजी मनसेने जिल्हाधिकारी यांना प्रत्यक्ष भेटून तक्रार दाखल केली परंतु अद्याप आपल्या विभागाकडून कोणतीही कार्यवाही करण्यात आली नसल्याने अनाधिकृत लेआऊट धारकांचे मनोबल वाढले आहे .
ढाणकी शहरात अनाधिकृत लेआऊट धारकांचा सुळसुळाट झाला आहे शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेता भविष्यात होणाऱ्या तालुक्याचे संकेत पाहन बिल्डर लॉबी या संधीचे सोने करून घेताना दिसत आहे. ढाणकी शहरातील सर्व अनधिकृत लेआउटची चौकशी होऊन तात्काळ त्यांची विक्री बंद करण्यात यावी तसेच या अनधिकृत लेआउटला खतपाणी घालणाऱ्या भ्रष्ट अधिकाऱ्यांवर सुद्धा कारवाई करण्यात यावी. सोबतच आता या सर्व ले आउट चे एन ए रद्द करा अन्यथा काम बंद पाडण्याचा ईशारा मनसेच्या वतीने दिलेल्या निवेदनातून मनसेचे जिल्हाध्यक्ष देवा शिवरामवार, अनिल हमदापुरे उमरखेड तालुकाध्यक्ष सादिक शेख यांनी दिला.

ढाणकी शहरात दररोज एका नवीन लेआउट निर्माण होत आहे . यासाठी तालुका महसुल प्रशासन कोणतीही शहानिशा न करता परवानगी देत आहेत . शासनाच्या नियमांना बगल देऊन लेआउट मध्ये कोणत्याही सोयी सुविधा उपलब्ध न करता सर्रास प्लॉट विक्री सुरू आहे. परिणामी या सर्वांचा भार नगरपंचायत वर पडत असून सर्वसामान्य नागरिक नगरपंचायत कडे नळ, नाल्या,रस्ते, लाईन, त्यासाठी अर्ज करताना दिसत आहे. बिल्डर लॉबी आपल्या फाय‌द्यासाठी सर्व नियम धाब्यावर बसून प्रशासनाला चुना लावत, आपल्या संधीचे सोने करत आहे. हे सर्व होत असताना कोणत्याच विभागामार्फत या अनधिकृत लेआउट धारकांवर कार्यवाही होताना दिसत नाही परिणामी प्लॉट धारकाचे आर्थिक फसवणूक होत आहे. हा सर्व प्रकार संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने सुरू असून सर्वसामान्य नागरिकांची फसवणूक केल्या प्रकरणी तसेच सर्व नियम डावलून संबंधित लेआउट धारकांना परवानगी दिल्याप्रकरणी या सर्व प्रकरणाची चौकशी करून ढाणकी शहरात चालू असलेल्या सर्व प्लॉटिंगची चौकशी व्हावी तसेच कुठली शहानिशा न करता परवानगी देणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी तालुका अध्यक्ष सादिक शेख यांनी या प्रसंगी केली.
या गंभीर बाबीकडे आपण जातीने लक्ष देऊन सर्व प्लॉट धारकांना तात्काळ सर्व सुखसोई उपलब्ध करून देण्यासंदर्भात आदेश द्यावेत तसेच जोपर्यंत सर्व सुविधा उपलब्ध होत नाही तोपर्यंत सर्व ढाणकी शहरातील प्लॉट विक्री बंद करण्यात यावी . सर्व अनधिकृत लेआउट चे एन ए रद्द करा अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने या सर्व लेआउट चे काम बंद पाडून ढाणकी नगरपंचायत समोर सर्वसामान्य नागरिकांची फसवणूक केल्यामुळे तिव्र आंदोलन करण्याचा ईशारा प्रामुख्याने मनसेचे जिल्हाध्यक्ष देवा शिवरामवार, अनिल हमदापुरे,उपजिल्हाध्यक्ष डेव्हिड शहाणे तालुकाध्यक्ष सादिक शेख, यांनी दिला. याप्रसंगी सचिन येलगंधेवार, शंकर वरघट, मुकुंद जोशी, सिद्धार्थ घुगरे, हिरासिहं चव्हाण, मुन्ना रहेमान, सुनिल तायडे, सोनु गुप्ता, तुषाल चोंडके यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.