Home यवतमाळ असे घडले शंभूराजे…!

असे घडले शंभूराजे…!

254

सईबाईनंतर त्यांच्या प्रेमाला पोरके झालेल्या शंभूराजेंना स्वराज्य रक्षणाचे धडे देत आऊसाहेबांनी घडविले. साक्षात जगदंबेच्या सावलीत लहानाचा मोठा झालेला सह्याद्रीचा प्रचंड दुर्ग, त्याच्या संगतीत आऊसाहेबांनी शौर्याच्या अलंकाराने स्वराज्यातील मौल्यवान असा शंभूराजेंसारखा दागिना घडविला.

छत्रपतींच्या या छाव्याने मोघलांना कडवी झुंज देत, आपल्या रक्ताच्या सिंचनाने धरणीला पावन करीत महाराष्ट्राला स्वाभिमानाचे धडे दिले. महाराष्ट्राच्या अस्मितेचे प्रतीक असलेले स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांची आज (१४ मे) जयंती. त्यानिमित्त यवतमाळ येथील प्रा. सोनल प्रफुल्ल देशमुख आणि जय आदित्य कुलकर्णी यांनी अुनक्रमे राजमाता जिजाऊ आणि बाल शंभुराजेंची वेशभूषा साकारली व छत्रपती संभाजी महाराज कसे घडले? हे या चित्रमालिकेतून दर्शवून अनोखे अभिवादन केले.

(छायाचित्र – सान चव्हाण)