Home यवतमाळ यवतमाळ जिल्हा पोलीस दलातर्फे राबविण्यात आले ऑपरेशन प्रस्थान अंतर्गत महिला व मुलींकरीता...

यवतमाळ जिल्हा पोलीस दलातर्फे राबविण्यात आले ऑपरेशन प्रस्थान अंतर्गत महिला व मुलींकरीता महिला सुरक्षा व सक्षमीकरण शीबीर सत्र 02

319

यवतमाळ जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. कुमार चिंता साहेब यांचे संकल्पनेतून ऑपरेशन प्रस्थान या अभिनव उपक्रमाची सुरुवात करण्यात आली.

ऑपरेशन प्रस्थान उपक्रमांतर्गत भव्य रोजगार मेळावा घेण्यात आला. तसेच पोलीस व जनतेतील संबंध दृढ व्हावे, व ग्राम पातळीवरून शहरी भागापर्यंत खेळाडूंना संधी मिळावी, याकरिता क्रीडा महोत्सव घेण्यात आला होता. त्याच धर्तीवर मुलींना स्वसंरक्षणाचे धडे देण्याचे हेतूने दिनांक 21 एप्रिल 2025 ते 22 एप्रिल 2025 पर्यंत दोन दिवसीय निवासी शिबिरा चे सत्र क्र 01 आयोजन करुन यशस्वी रीत्या पार पाडण्यात आले होते. त्यामध्ये 228 मुलींनी सहभाग घेतलेला होता. त्याचप्रमाणे दिनांक 29/04/2015 दरम्यान मुली व महिलांकरिता सक्षमीकरण शीबीर सत्र 02 करिता दोन दिवसीय निवासी कराटे शिबिर आयोजित करण्यात आले होते. त्यामध्ये स्वसंरक्षण तसेच कायदेविषयक ज्ञान, आरोग्य विषयक माहिती, स्ट्रेस मॅनेजमेंट, सायबर गुन्हे, यासंबंधी मुलींना माहिती देण्यात आली. सदरचे शिबिरामध्ये कराटे प्रशिक्षक ब्लॅक बेल्ट व कराटे मध्ये प्राविण्य मिळविलेले श्री. आनंद भुसारी व त्यांची टीम यांनी मुलींना कराटेचे प्रशिक्षण दिले, तसेच एडवोकेट सीमा तेलंगे यांनी मुलींना कायदेविषयक ज्ञान व आपले अधिकार याबाबत माहिती दिली, डॉक्टर वृषाली माने मॅडम यांनी मुलींना येणाऱ्या आरोग्यविषयक समस्या त्यावरील उपाय आणि उपचार तसेच भविष्यामध्ये आजार होऊ नये याबाबत घ्यावयाची काळजी यासंबंधी माहिती दिली, शितल मालटे मॅडम, पोलीस निरीक्षक, सीसीटीएनएस यांनी मुलींना शिक्षणामुळे आपल्या जीवनात काय बदल होऊ शकतो, आणि आपण सन्मानाने कसे जगू शकतो, राहू शकतो मुलींमध्ये होणारे शारीरिक बदल आणि त्याच वयात शैक्षणिक मार्गक्रमन याची सांगड घालून यशस्वी जीवनाकडे वाटचाल करणे, याबाबत मार्गदर्शन केले. श्री. राहुल आठवले पोलीस निरीक्षक, सायबर पोलीस स्टेशन, यांनी मुलींकडून होणाऱ्या चुका, भावनेत वाहवत गेल्यानंतर त्याचे होणारे दुष्परिणाम, याबाबत एक पालक या नात्याने समजावून सांगितले, सायबर गुन्हे व त्या गुन्ह्यांपासून स्वतःचा कसा बचाव करावा याबाबत माहिती श्री. प्रकाश तायडे, साहेब पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन सायबर, यांनी दिले, काम करत असताना येणारा ताण तणाव व त्या ताणतणावर कशी मात करावी, स्ट्रेस मॅनेजमेंट बाबत श्री. सचिन साखरकर यांनी मुलींना मार्गदर्शन केले.
सदर शिबिराचा निरोप समारंभ दिनांक 30/04/2025 रोजी पोलीस कवायत मैदान, पळसवाडी, यवतमाळ येथे आयोजित करण्यात आला. सदर कार्यक्रमाकरिता यवतमाळ जिल्हाधिकारी IAS श्री. विकास मीना साहेब, मा. जिल्हा पोलीस अधीक्षक IPS श्री. कुमार चिंता साहेब उपविभागीय पोलीस अधिकारी दारवा IPS श्री रजनीकांत चीलुमुला साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी पुसद, IPS. श्री. B.J. हर्षवर्धन साहेब, तसेच केंद्रीय लोकसेवा आयोगाकडुन नकतीच परीक्षा उत्तीर्ण झालेल्या IAS यवतमाळच्या सुकन्या अदिबा अनम अश्फाक अहमद, तसेच यवतमाळ सुपुत्र जयकुमार आडे व अभय दिगांबर देशमुख हजर आले. त्यांचा मान्यवरांचे हस्ते सत्कार करण्यात आला. यवतमाळ ची सुकन्या अदिबा अनम अश्फाक अहमद यांनी शीबीरार्थी मुलींबरोबर सर्वसामान्य शीबीरार्थी प्रमाणे शीबीरामध्ये दोन दिवस सहभाग घेतला व पोलीस कवायत मैदान, यवतमाळ येथे प्रत्यक्ष कराटे प्रशीक्षण पूर्ण केले. शीबीरार्थी मुलींना, कराटे प्रशीक्षकांना तसेच पोलीस अधिकारी/अंमलदार सर्व या बाबद अनभी‌न होते. शीबीराचे समारोपीय कार्यक्रमामध्ये अदिबा अनम अश्फाक अहमद यांना व्यासपीठावर बोलविले व त्या शीबीरार्थी मुलींमधुन व्यसपीठावर आल्यात त्यावेळी सर्वांनी आश्चर्य व्यक्त केले व त्यांचे कौतुक केले. सदर शीबीराचे समारोपीय कार्यक्रमामध्ये मुलींना मार्गदर्शन केले. अदिबा अनम अश्फाक अहमद यांनी शीबीरार्थीना प्रोत्साहित केले की, तुम्हि क्षेत्र कोणतेहि नीवडा परंतु त्या क्षेत्रा मध्ये तुम्ही प्रामाणीकपणे व मेहनतीने प्रयत्न करा यश नीश्चीतच प्राप्त होईल. सदरचे निरोपिय समारंभ चे कार्यक्रमाला लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून उत्तीर्ण झालेले व्यासपीठावरील सात मान्यवरांना पाहून मुलींना अभ्यासाची प्रेरणा मिळाली व अभ्यासाचे मार्गाने कशा पद्धतीने प्रशासकीय सेवेत दाखल होता येते याचे फार मोठे उदाहरण त्यांनी प्रत्यक्ष व्यासपीठावर नजरेने पाहिले. त्याचप्रमाणे आम्ही सुद्धा अशाच पद्धतीने अभ्यास करून कुठल्या ना कुठल्या परीक्षेत यश मिळवू अशा पद्धतीचे मनोगत व्यक्त केले. लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण केलेले सात मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते हा सोहळा न भूतो न भविष्यती होता. शिबिराचे समारोपय कार्यक्रमाकरिता उपविभागीय पोलीस अधिकारी श्री रामेश्वर व्यंजने उपविभागीय पोलीस अधिकारी पांढरकवडा, तसेच श्री. गणेश केंद्रे उपविभागीय पोलीस अधिकारी वनी वनी, श्री. सुनील हूड उपविभागीय पोलीस अधिकारी, मुख्यालय, पोलीस विभागातील कार्यरत अधिकारी व अंमलदार, शिबिरार्थी यांचे पालक हजर होते. सदर चे शिबिर मुलींना किती उपयोगाचे आहे आणि त्याचा त्यांना जीवनामध्ये फार उपयोग होईल याबाबत शिबिरात त्यांनी मनोगत व्यक्त करून सदर शिबिराचे आयोजन केल्यामुळे यवतमाळ जिल्हा पोलीस अधीक्षकांचे व यवतमाळ जिल्हा पोलीस दलाचे आभार मानले. शिबिरार्थी मुलींना प्रशस्तीपत्र देऊन कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन सपोनी. शुभांगी गुल्हाने व सपोनी नीलिमा सातव यांनी केले. तसेच कार्यक्रमाकरिता लाभलेले उपस्थित मान्यवर पालक, पोलीस अधिकारी, पोलीस अंमलदार यांनी प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष सहभाग घेतला त्यांचे पोलीस निरीक्षक ज्ञानोबा देवकते वाहतूक शाखा यांनी आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.