Home यवतमाळ जिल्हा परिषद पदवीधर शिक्षकांच्या उपोषणाला मनसेचा पाठिंबा….

जिल्हा परिषद पदवीधर शिक्षकांच्या उपोषणाला मनसेचा पाठिंबा….

335

महाराष्ट्राच्या धर्तीवर तात्काळ शिक्षकांच्या प्रलंबित मागण्या निकाली काढा… मनसे

यवतमाळ जिल्हा परिषद समोर महाराष्ट्र राज्य पदवीधर प्राथमिक शिक्षक व केंद्रप्रमुख संघटना व इतर संघटनेच्या पाठिंब्याने शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी उपोषण सुरू आहे. गेल्या दहा दिवसापासून सुरू असलेल्या या उपोषणाला आतापर्यंत एकाही जबाबदार अधिकाऱ्याने भेट देऊन साधी त्यांच्या मागण्यांची विचारपूस सुद्धा केली नाही. अशा परिस्थितीत मनसेच्या वतीने मनसे जिल्हाध्यक्ष देवा शिवरामवार, अनिल हमदापुरे यांनी आज या शिक्षकांची भेट घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.
यवतमाळ जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक यांच्या पदोन्नतीचा प्रश्न गेल्या कित्येक वर्षापासून प्रलंबित आहे . शिक्षण वेतनश्रेणीतील दूर करून सुधारित आदेश काढणे, उर्दू माध्यमांच्या विषय शिक्षकांचे वेतनश्रेणीचा प्रश्न, विस्तार अधिकारी पदोन्नतीच्या तीनदा अंतिम याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या तरीसुद्धा त्यांची समुपदेशनाची प्रक्रिया अद्याप प्रलंबित आहे, माध्यमिक शिक्षक, उच्च श्रेणी मुख्याध्यापक, विस्तार अधिकारी श्रेणी 3, तसेच वर्ग तीन च्या सर्व पात्र शिक्षकांच्या याद्या या सुद्धा अद्याप प्रसिद्ध करण्यात आल्या नाहीत यासह जिल्ह्यातील जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हा अंतर्गत व आंतर जिल्हा बदलां संदर्भात अद्याप जिल्हा परिषद यवतमाळ ने कोणतीही पावले उचलली नाही. या सर्व शिक्षकांच्या समस्या जाणून घेऊन उपोषण मंडपात भेट देत असताना सर्व शिक्षकांच्या प्रश्नांवर मनसे लवकरच प्रश्न निकाली न निघाल्यास जिल्हा परिषद शिक्षणाधिकाऱ्यांना, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना घेराव करणार असा इशारा मनसेच्या जिल्हाध्यक्ष देवा शिवरामवार यांच्यावतीने वतीने देण्यात आला. याप्रसंगी शिक्षकांच्या या गंभीर विषयावर शिक्षण विभागा ची उदासीनता पाहता मनसेचे अनिल हमदापूरे यांनी शिक्षणाधिकारी मिश्रा यांना तात्काळ फोन लावून शिक्षकांच्या या प्रश्नांवर तात्काळ पावले उचला तसेच संपूर्ण महाराष्ट्रात पदोन्नती प्रक्रिया प इतर प्रश्न निकाली निघाले असताना यवतमाळ शिक्षण विभाग कोणत्या मुहूर्ताची वाट पाहत आहे , संबंधित विभागाला संपूर्ण प्रक्रिया मार्च महिन्यातच पूर्ण करण्याचे आदेश असताना शिक्षण विभाग झोपा काढत आहे का असा सवाल मनसेच्या वतीने करण्यात आला. संबंधित विषयात तात्काळ पावले न उचलल्यास या आंदोलनात मनसे सक्रियपणे सहभाग नोंदवत घेराव आंदोलन घेईल तसेच होणाऱ्या सर्व परिणामांना जिल्हा परिषद शिक्षण विभाग जबाबदार राहील असा इशारा अनिल हमदापुरे यांनी दिला. याप्रसंगी शिक्षणाधिकारी मिश्रा यांनी येत्या पंधरा दिवसात सर्व विषय निकाली काढल्या जाईल असे आश्वासन दिले. या आंदोलनासाठी विशेष करून महाराष्ट्र राज्य पदवीधर, प्राथमिक शिक्षक, केंद्र प्रमुख सभा जिल्हा यवतमाळ शाखेचे
महेंद्र वेरूळकर, तसेच यवतमाळ जिल्हा परिषद कर्मचारी पतसंस्थेचे अध्यक्ष महेश सोनेकर या आंदोलनाला उभारी देण्याचे काम करत सक्रिय सहभाग नोंदवत आहे. सदर आंदोलनाला सर्व शिक्षक संघटनेचा जाहीर व सहभाग नोंदवत सक्रिय पाठिंबा असून यात प्रामुख्याने संघटनेचे नरेंद्र परोपटे, रुपेश हिवरकर, देवराव डेबरे, विकास दरणे, अरुण महल्ले, रविंद्र बोबडे, मनीष लढी, देवेंद्र ठाकरे, कुणाल नवरे, अतुल खासरे, अरुण मेश्राम, महेश खोडके, कैलास गवाणकर, अशोक राऊत, बी पी राठोड संजय पांडे, दत्ता येंडे, प्रकाश सांडे, उद्धव घोडे व इतर शिक्षक सहभाग नोंदवत आहे. या उपोषण मंडपाला भेट देते प्रसंगी मनसेचे जिल्हाध्यक्ष देवा शिवरामवार, अनिल हमदापुरे, लकी छांगाणी, तुषार चोंडके, सोनू गुप्ता, अनिकेत सुरटकर, बबलू मसराम, अक्षय सयाम, मयूर कारंजकर, शिवम नांदुरकर यासह इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.