Home यवतमाळ नागपुरच्या पियुषने गुटखा तस्करीचे यवतमाळात पसरवले जाळे

नागपुरच्या पियुषने गुटखा तस्करीचे यवतमाळात पसरवले जाळे

417

(बाभुळगावातील एफाज तसेच राळेगावातील रंजीत करतो गुटख्याचा पुरवठा)

जिल्ह्यात सर्रास प्रतीबंधीत गुटखा व तंबाखूची विक्री

यवतमाळ : राज्यात गुटखाबंदी लागू असली तरी सर्रास गुटख्याची विक्री होत आहे. या पार्श्वभूमीवर गुटखाबंदीसाठी कडक अंमलबजावणी करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहे. मात्र नागपुरातील पियुष यवतमाळात मनगोल्ड तसेच अहमदाब गोल्ड नावाचा जाफराणी जर्दा यवतमाळातील बाभुळगाव येथील ऐफाज तसेच राळेगाव येथील रंजीत कडे मोठ्या प्रमाणात गुटख्याचा पुरवठा केला जात आहे.विशेष म्हणजे जाफरानी जर्दा ट्रान्सपोर्ट च्या सहाय्याने केला जात आहे.त्यामुळे अद्यापपर्यंत कुणालाही भणक लागली नाही, कोट्यावधी रूपयाचा जाफरानी जर्दा दररोज ऐफाज तसेच रंजीत विविध मार्गाने यवतमाळ जिल्ह्यात पुरवठा केला जात आहे. यासाठी स्थानिक गुन्हे शाखेतील वसुली बाज पोलीस लाखो रूपयाची रसद पुरवली जात आहे.त्यामुळे ऐफाज कारवाई पासुन दुर आहे.
राज्यातील गुटखाविक्रीच्या सूत्रधारांना शोधून त्यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्याचे आदेश उपमुख्यमंत्र्यांनी दिले आहे. ज्याक्षेत्रात गुटखा व प्रतिबंधित खाद्यपदार्थांचा साठा किंवा वाहतूक होताना आढळून येईल, तिथल्या अन्न व औषध प्रशासन अधिकारी आणि पोलिस अधिकाऱ्यांना जबाबदार धरुन त्यांच्यावरही कारवाई करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.
गुटखा, पान मसाला, सुगंधित तंबाखू आणि सुपारी, खर्रा, मावा यांसारख्या प्रतिबंधित अन्नपदार्थांचे उत्पादन तसेच विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्यासंदर्भात, उपमुख्यंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली 5 फेब्रुवारीला मंत्रालयात बैठक झाली. या बैठकीत गृहमंत्री , अन्न व औषध प्रशासन मंत्री यांच्यासह वरिष्ठ अधिकारी बैठकीला उपस्थित होते. यवतमाळ जिल्ह्यात कर्नाटक, गुजरात,मध्यप्रदेश या राज्यातुन मोठ्या प्रमाणात गुटख्याची खेप यवतमाळ जिल्ह्यात उतरविली जाते. गुटखा तस्करीत आपले पाय रोवणार्या तस्करांनी कायद्याचा पळवाटा शोधत अधिकारी तस्करांशी हातमिळवणी करून आपले हित साध्य करण्यातच धन्यता मानली आहे.यवतमाळ शहरातील पुनम चौक परीसरात तंबाखू पुड्या तयार करण्याचा कारखाना असुन सुद्धा शहर पोलीसांकडुन या कारखान्यावर आत्तापर्यंत कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. मात्र काल झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत गुटखा तसेच तंबाखु जन्य पदार्थ बाजारात विक्री करीत असेल तर त्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्याचे आदेश दिले आहे या आदेशाची अंमलबजावणी न केल्यास संबधीत पोलीस अधिकारी तसेच अन्न औषध प्रशासनाच्या अधिकार्यावरही कारवाई करण्याचे आदेश यावेळी दिले आहे त्यामुळे प्रशासानात चांगलीच खळबळ उडाली आहे.गुटखा तस्करांकडुन मलीदा लाटणार्या पोलीस प्रशासनाकडुन गुटखा पकडल्यानंतर त्यात डिंलीग करून हातवर करणार्या पोलीसांवर आता मंत्री महोदयांनीच कारवाईचे आदेश दिले आहे.त्यामुळे पोलीस आता कारवाई करतील की नाही याकडे लक्ष लागले आहे त्याचप्रमाणे यवतमाळ जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सुगंधी तंबाखुची खेप उतरविली जाते.ही खेप थेट ट्रान्सपोर्टच्या माध्यमातुन आणली जाते त्यामुळे बंदी असलेला सुगंधीत जाफरानी मजा तंबाखु यवतमाळात सर्रास विक्री केला जात आहे. विशेष म्हणजे पानटपर्यावर हा मजा तंबाखु पोहचवुन देण्याचे कामही सुगंधी तंबाखु विक्री करणार्या होलसेल डिलर कडुन केला जात आहे. यवतमाळ जिल्ह्यात खर्रा व गुटख्याच्या सेवनाने अनेकांना दुर्धर आजार झाले असुन वैद्यकीय अहवालानुसार सर्वाधिक आजार हे गुटखा व सुंगधी जाफरानी तंबाखुच्या सेवनाने होत असल्याची बाब समोर आली आहे.
आघाडी सरकारच्या काळात राज्यात गुटखाबंदी लागू करण्यात आली, त्याची कडक अंमलबजावणीही झाली. त्यामुळे गुटखा कंपन्या राज्याबाहेर गेल्या. अलिकडच्या काळात परराज्यांच्या सीमेवरुन मोठ्या प्रमाणावर गुटखा आणि प्रतिबंधित अन्नपदार्थांची राज्यात आयात केली जात आहे. त्यांची राज्यात साठवणूक होते. कधीकधी हा माल पकडलाही जातो आणि वाहनचालकांवर कारवाई होते, परंतु सूत्रधारांना धक्का लागत नाही. गुटखामाफियांवर वचक निर्माण होत नाही. यापुढच्या काळात राज्यात गुटखाबंदीची राज्यात कडक अंमलबजावणी होईल. त्यासाठी या व्यापारातील सूत्रधारांना ‘मोक्का’ लावून त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत विचार करण्यात येईल. अन्न व औषध प्रशासन, पोलिस व परिवहन विभागाचे अधिकारी समन्वयाने कारवाई करतील. गुटखाविक्रीला संरक्षण देताना जे अधिकारी आढळतील त्यांची गय केली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा अजित पवार यांनी  दिला.
राज्यात येणारा गुटखा रोखण्यासाठी सीमेवरील तपासणी कडक करण्यात यावी. त्यासाठी अधिकाऱ्यांना प्रोत्साहन द्यावे. गुटखा विक्रीसंदर्भातील माहिती मिळवण्यासाठी खबऱ्यांचे जाळे भक्कम करण्यात यावे, अशा सूचनाही अजित पवार यांनी दिल्या. त्यासाठी अन्न व औषध प्रशासनाला निधी वाढवून देण्याचंही त्यांनी मान्य केले गुटखाबंदीबाबत जिल्हास्तरावर विविध विभागांच्या माध्यमातून जनजागृती करण्यात यावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.या बैठकीत सध्या राज्यात विक्री होत असलेल्या गुटखा आणि प्रतिबंधित सुपारी, मावा, खर्रा यांच्या ब्रँडची नावेही त्यांनी वाचून दाखवली आणि त्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले. यापुढच्या काळात गुटखाविक्रीच्या अवैध व्यवसायात असलेल्या कंपन्यांच्या मालकांना आणि मुख्य सूत्रधारांना शोधून थेट त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. यामुळे शालेय विद्यार्थी तसेच तरुण गुटख्याच्या दुष्परिणामापासून वाचतील, असा विश्वासही अजित पवार यांनी व्यक्त केला.