Home विदर्भ गर्दीचा फायदा घेत पळविले दागिने…

गर्दीचा फायदा घेत पळविले दागिने…

288

वर्धा, ( ब्युरो ) –  बसमध्ये चढत असलेल्या नागरिकांच्या गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने महिले जवळील बॅग मधील सोन्याचे दागिने लंपास केले. ही घटना बुधवारी (दि. 2) देवळी येथील बसस्थानक परिसरात घडली. तक्रारीनंतर

शुक्रवारी (दि. 4) उघडकीस आली. देवळी येथील रहिवासी मिनाक्षी गजानन टाळपेकर या नियोजित ठिकाणी जाण्यासाठी देवळी येथील बसस्थानकावर आल्या. त्या बसमध्ये चढत असताना चोराने नागरिकांच्या गर्दीचा फायदा घेत

त्यांच्या जवळील बॅग मधील 30 ग्रॅम वजनाची सोन्याची पोत, 5 ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी चोरून नेली. गर्दीचा फायदा घेत चोरून नेल्याचे लक्षात येताच मिनाक्षी टाळपेकर यांनी देवळी पोलिस स्टेशन गाठून तक्रार नोंदविली.