Home विदर्भ हिंगणघाट प्रखंड विश्व हिंदू परिषद मातृशक्ती, दुर्गावाहिनी बैठक संपन्न..

हिंगणघाट प्रखंड विश्व हिंदू परिषद मातृशक्ती, दुर्गावाहिनी बैठक संपन्न..

259

वर्धा / हिंगणघाट:- येथे माधवनाथ मठ, टिळक चौक येथे विश्व हिंदू परिषद मातृशक्तीआणि दुर्गा वाहिनी तर्फे रामजन्मोत्सव कार्यक्रम घेण्यात आला यावेळी हिंगणघाट मधील भरपूर प्रमाणात मातृशक्ती आणि दुर्गा वाहिनी च्या स्त्रियांची उपस्थिती होती… या कार्यक्रमात विहिपं मातृशक्ती विभाग संयोजिका अनुराधाताई महाकाळकर श्रीराम चरीत्र व विहिंप संघटना यावर मार्गदर्शन केले तसेच वर्धा नगर मातृशक्ती संयोजिका सौ रुपालीताई इंगोले यांनी सेवा सुरक्षा संस्कार या विषयावर मार्गदर्शन केले या प्रसंगी विश्व हिंदू परिषद जिल्हा सहमंत्री शरदभाऊ कोणप्रतीवार,नगर सहमंत्री देवाभाऊ वाघमारे,वर्धा मातृशक्ती सहसंयोजिका विद्याताई पेंडके,जिल्हा विहिपं विधी प्रकोष्ट प्रमुख ऍड राखीताई वैरागडे, हिंगणघाट नगर मातृशक्ती संयोजिका अपर्णाताई क्षीरसागर, हिंगणघाट शहर दुर्गा वाहिनी संयोजिका सौं पुष्पाताई सूर्यवंशी, सौं पुष्पाताई खुपसरे या कार्यक्रमाला उपस्थित होत्या… या वेळी दुर्गावाहिनी हिंगणघाट ग्रामीण प्रखंड सहसंयोजिका म्हणून वैष्णवी धनरेल यांची नियुक्ती अनुराधाताई महाकाळकर यांच्या हस्ते करण्यात आली या कार्यक्रमांस भरपूर स्त्री वर्ग उपस्थित होते ….. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन विहिपं जिल्हा मंत्री शरद कोणप्रतिवार यांनी केले…