Home यवतमाळ यवतमाळात ‘आव्हान’ संघटनेचा शिवसेनेत जोशपूर्ण प्रवेश; शक्तिवृद्धीस नवसंजीवनी!”

यवतमाळात ‘आव्हान’ संघटनेचा शिवसेनेत जोशपूर्ण प्रवेश; शक्तिवृद्धीस नवसंजीवनी!”

265

यवतमाळ  – पालकमंत्री नामदार संजय राठोड यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वामुळे शिवसेनेच्या विस्तार आणि विकासाला आणखी नवे बळ मिळाले आहे.दिनांक ३ एप्रिल (गुरुवार) रोजी यवतमाळच्या समता मैदानावर पार पडलेल्या “आभार यात्रेच्या” भव्य सभेत, ‘आव्हान’ संघटनेचे प्रमुख प्रद्युम्न जवळेकर यांनी शेकडो युवक कार्यकर्त्यांसह शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.
हा प्रवेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत उत्साही वातावरणात पार पडला. प्रवेशाआधी,छत्रपती शिवाजी महाराज,डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या चरणी अभिवादन करून कार्यकर्त्यांनी जनसेवेचा संकल्प केला.
‘आव्हान’ ही संघटना गेल्या अनेक वर्षांपासून ग्रामीण आणि शहरी भागात सक्रिय आहे.मात्र,सत्ता हाताशी असल्यास समाजसेवा अधिक प्रभावीपणे करता येते,या विचारातून पालकमंत्री संजय राठोड यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनामुळे हा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला,असे प्रद्युम्न जवळेकर यांनी सांगितले.
या वेळी हरिहर लिंगनवार,श्रीधर मोहोड,पराग पिंगळे आणि संजय हातगावकर यांचाही मोलाचा सहभाग व मार्गदर्शन लाभले.
या प्रवेशामुळे शिवसेनेला नव्या ऊर्जेची आणि जनाधाराची मोठी ताकद लाभली असून,आगामी काळात पक्ष कार्यात अधिक गतिशीलता येणार हे निश्चित!

कोट—
“सत्ता ही केवळ प्रतिष्ठा,पद किंवा अधिकार मिळवण्याचं साधन नसून,ती समाजाच्या शेवटच्या माणसासाठी काम करण्याची संधी असते.शिवसेनेत प्रवेश हा आमचा निर्णय नसून,तो जनतेच्या अपेक्षांचा आदर आहे.शासनाच्या माध्यमातून अधिक परिणामकारकपणे जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी आणि युवकांना दिशादर्शक ठरण्यासाठी आम्ही हा मार्ग स्वीकारला आहे.”
— प्रद्युम्न जवळेकर