
यवतमाळ,दि.23 मार्च – शहीद-ए-आझम भगतसिंग विचारमंच,यवतमाळच्या वतीने आज 23 मार्च (रविवार) रोजी हुतात्मा चौक,यवतमाळ येथे शहीद भगतसिंग,राजगुरू आणि सुखदेव यांच्या शहीद दिनानिमित्त अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला.उपस्थित मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून वीर शहीदांना अभिवादन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.प्रवीण देशमुख यांनी करत भगतसिंग यांच्या विचारांचे महत्त्व अधोरेखित केले.त्यांनी सांगितले की, “भगतसिंग यांचा लढा केवळ स्वातंत्र्यासाठी नव्हता,तर सामाजिक परिवर्तनासाठीही होता.तरुणांनी त्यांच्या विचारांचा अभ्यास करून अन्यायाविरोधात उभे राहावे.”
मुख्य मार्गदर्शक मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर गायकवाड यांनी भगतसिंग यांच्या क्रांतिकारक विचारांवर बोलताना सांगितले की,”त्यांनी केवळ शस्त्रांनी नव्हे,तर लेखणीच्या माध्यमातूनही समाजाला जागृत केले.आजच्या पिढीने त्यांच्या विचारांची दिशा समजून घेतली पाहिजे.”
या वेळी प्रा.घनश्याम दरणे
किशोर चव्हाण,प्रद्युम्न जवळेकर, उदय सरतापे,कॉम्रेड सचिन मनवर, प्रमोद कांबळे,प्रा.राहटे यांची उपस्थिती होती.कार्यक्रमाचे संचालन आणि आभार प्रदर्शन प्रा.पंढरी पाठे यांनी केले.












































