Home यवतमाळ महागीतायज्ञ परिक्षेमध्ये सौ.प्रतिभाताई अशोक निलावार प्रथम

महागीतायज्ञ परिक्षेमध्ये सौ.प्रतिभाताई अशोक निलावार प्रथम

355

यवतमाळ,:- कर्नाटकातील श्री शंकराचार्य महासंस्थान द्क्षिणाम्नाय शारदापीठम, श्रुंगेरी येथे झालेल्या भगवतगीते वरील महागीतायज्ञ या परिक्षेमध्ये सौ.प्रतिभाताई अशोक निलावार यांनी ऊत्तम यश मिळवून प्रथम क्रमांक पटकावला. ही परिक्षा गीतेतील 18 अध्याय कंठस्थीकरणाची होती. या मधे 700 श्लोक मुकपाट झाले आहे. या गीतामहायज्ञ परिक्षेत प्रथम क्रमांकाचे यश मिळाल्याबद्दल श्रुंगेरी पिठाच्या वतीने त्यांना प्रशस्तीपत्र व 21 हजार रुपयांचे रोख पारितोषिक आदी गुरू शंकराचार्य यांच्या हस्ते देण्यात आले. शृंगेरी पिठ् आदी शंकराचार्य यांनी स्थापले ले चार प्रमुख मठांपैकी एक आहे हे विशेष उल्लेखनीय आहे.

या आधी त्यांनी गीता परिवारा तर्फे घेण्यात आलेल्या गीताव्रती परिक्षेतही ऊत्तम यश मिळवले. या परिक्षेत त्यांच्याबरोबर असलेल्या ईतर 6 जणांनी पण ऊत्तम यश मिळवले.
या यशाबद्दल त्यांच्या परिवाराने व त्यांच्या मित्र व मैत्रीणीतर्फे तसेच शहरातील आध्यात्मिक सघंटने च्या वतिने अभिनंदन करण्यात आले.भविष्यात स्वतच्या व इतरांच्या जीवनात गीता रुजवण्याची त्यांची मनस्वी इच्छा आहे.गीतेचा प्रचार ,प्रसार करण्याचा त्यांचा मानस आहे.